अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
थेपडे विद्यालयात झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे स्वा. सै. पं.ध.थेपडे. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्वच झाडांना मुख्याध्यापक पी. डी. चौधरी सर, उपमुख्याध्यापक जी. डी. बच्छाव सर, पर्यवेक्षक के. पी. पाटील सर यांनी राख्या बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यावेळी पी.डी चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचे मार्गदर्शन करून घरोघरी वृक्षारोपण करण्याच्या सूचना केल्या. यावेळी श्रीमती व्ही.एम.सूर्यवंशी मॅडम, सौ. बी. एच. कोल्हे मॅडम, श्रीमती संगीता पाटील मॅडम, तुषार पाटील उपस्थित होते.
