अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सातारा जिल्ह्यात गणेशोत्सवात लेझर, बीम लाईटवर पूर्णता बंदी :- उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होणार :- पोलीस अधीक्षक तुषार दोशी..!!
अनुजा कारखेले (सातारा जिल्हा) प्रतिनिधी
सध्या गोकुळाष्टमी,दहीहंडी गणेशोत्सव आगमन व विसर्जन मिरवणुकीत प्लाझ्मा,बीम लाईट लेझर बीम लाईट व प्रेशरमीडच्या वापरांवर जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी बंदी घातली आहे. उल्लंघन केल्यास तातडीने गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशाराही जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिला आहे. सातारा जिल्ह्यात 8 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत गोकुळाष्टमी दहीहंडी गणेशोत्सव आगमन,विसर्जन असे सण साजरे होत आहेत. या उत्सवांमध्ये मिरवणुकी वेळी गणेश मंडळे त्यांच्या वाद्यांमध्ये व स्टेरिओ सिस्टीम मध्ये प्लाझ्मा लाईट,लेझर बीम लाईट व प्रेशरमडिचा वापर करतात. या प्लाझ्मा बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे व कर्णकर्कश आवाजामुळे श्रवण यंत्रणावर डोळ्यांवर हृदयांस इजा होते. तसेच आरोग्यावरही धोका निर्माण होतो. तसेच रस्त्यावरून वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघातही घडू शकतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा सारासार विचार करून आगामी सण उत्सवांच्या कालावधीत लेझर लाईटच्या वापरांवर पूर्णता: निर्बंध घालण्यात आले आहेत. मिरवणुकी दरम्यान अशा प्रकारची विद्युत उपकरणे निदर्शनास आल्यास संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल केले जाणार आहेत असा इशाराही जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिला आहे. आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस प्रशासनाची जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांवर करडी नजर असणार आहे. या बाबत सर्व पोलीस ठाणेच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देखील गणेश उत्सवांच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गणेश मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून आगामी सण उत्सव आनंदात साजरे करावेत असे देखील आव्हानही जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.*
