खाऊच्या पैशातून जमवलेली भक्तीची रक्कम माऊलींच्या चरणी अर्पण करताना कु. श्रीमंत दादासाहेब करांडे
लहान वयात मोठी देणगी सुवर्ण कलशारोहणासाठी विद्यार्थ्याचा भावपूर्ण हातभार
भक्तीभावाची प्रेरणा – माऊलींच्या सुवर्ण कलशासाठी विद्यार्थ्याचे अर्पण
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सुवर्ण कलशासाठी खाऊची बचत अर्पण करणारा कु. श्रीमंत
खाऊपेक्षा भक्ती महत्त्वाची विद्यार्थ्याची सुवर्ण कलशासाठी अनोखी देणगी
छोटा हात… मोठं मन! – माऊलींसाठी विद्यार्थ्याची अनमोल देणगी
आळंदी –प्रतिनिधी गोपाळ भालेराव
भक्तीला वयाची मर्यादा नसते, हे दाखवून दिलं आहे
इयत्ता पहिलीत शिकणारा
कु. श्रीमंत दादासाहेब करांडे याला शिकत असलेली शाळा- जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक धानोरे शाळेचे मुख्याध्यापक श्री लोखंडे सर व वर्ग शिक्षिका सौ.शैला गावडे मॅडम यांचे मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्याने.संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील सुवर्ण कलशारोहण या पवित्र कार्यासाठी त्यांनी आपल्या खाऊच्या पैशांची बचत करून माऊलींच्या चरणी अर्पण केली.
दररोज मिळणाऱ्या खाऊतून थोडं-थोडं बाजूला ठेवत त्यांनी ही रक्कम जमवलीआणि मंदिर समितीकडे सुपूर्द केली.ही रक्कम कदाचित मोठी नसेल, पण त्यामागचा भाव, भक्ती आणि त्याग
हेच तिचं खरं मोल आहे.मंदिर समितीचे पदाधिकारी म्हणाले,
“लहान वयातही भक्तीभावाने प्रेरित होऊन योगदान देण्याची वृत्ती समाजासाठी प्रेरणादायी आहे.
अशा कृतीतून भविष्यातील संस्कारी पिढी घडते.”
कु. श्रीमंत यांची ही कृती पाहून उपस्थित भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
खरंच, भक्तीची खरी श्रीमंती मनात असते, पैशात नाही…
“माऊली, माझं छोटं अर्पण स्वीकारा” – भक्तीच्या भावनेतून उमटलेला लहानग्याचा आवाज माऊलींनी स्विकारला अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी गोपाळ भालेराव आळंदी पुणे
