अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
आज मुंबई उपनगर श्री गणेशोत्सव समन्वय समिती तर्फे रंगशारदा सभागृहात मीटिंग आयोजित करण्यात आली.
प्रतिनिधी मुकूंद मोरे:-
मुंबई उपनगर श्री गणेशोत्सव समन्वय समिती तर्फे आज रंगशारदा सभागृह, वांद्रे पश्चिम येथे मुंबई शहरातील गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी आणि मूर्तीकार ह्यांच्या सभेला पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी मार्गदर्शन केले. आरेमधील जंगल उध्वस्त करणाऱ्यांनी पर्यावरणाच्या नावाखाली गणेशोत्सव मंडळांकडून दंडरक्कम वसुलीची भाषा करणाऱ्यांचा उद्धवसाहेबांनी जोरदार समाचार घेतला. ह्यावेळी शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, शिवसेना नेते आमदार सुनिल प्रभू, शिवसेना उपनेते समन्वय समितीचे सचिव विनोद घोसाळकर, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना सचिव सुधीर साळवी तसेच मुंबईतील शिवसेना आमदार, समन्वय समितीचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
