देवेंद्र फडणवीसांचा अचानक मोठा निर्णय: प्रशासनात केला मोठा फेरबदल, (सात आयएएस ) अधिकाऱ्यांच्या बदल्या…!!
आरती पाटील ( मुंबई ) प्रतिनिधी
येत्या काही दिवसांत महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नेहमीच पोलिस आणि महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांची सूत्रे सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अचानक प्रशासनात फेरबदल केला आहे. यामध्ये आज सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर आपल्या नव्या पदस्थापने ठिकाणी अधिकाऱ्यांनी तात्काळ पदभार घ्यावा असाही आदेश नमूद केला आहे. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची पुढील प्रमाणे नावे
1. डॉ. अशोक करंजकर (IAS:SCS:2009) यांना उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
2. डॉ. संजय कोलते (IAS:SCS:2010) जिल्हाधिकारी, भंडारा यांची व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वासन प्रकल्प, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. श्री सुशील खोडवेकर (IAS:RR:2011) सदस्य सचिव, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ, मुंबई यांची विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. श्री सावन कुमार (IAS:RR:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांची जिल्हाधिकारी, भंडारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. श्री नमन गोयल (IAS:RR:2022) प्रकल्प अधिकारी, ITDP, भामरागड आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, अटापली उपविभाग, गडचिरोली यांना [मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
6. डॉ.जी.व्ही.एस. पवनदत्त (IAS:RR:2023) सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची सहायक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7. श्रीमती लघिमा तिवारी (IAS:RR:2023) सहायक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर यांची सहायक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
