अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अंबरनाथचा अभिमान आपल्या सर्वांच्या हृदयातील आनंदाची बातमी!
प्रतिनिधी मुकुंद मोरे
अंबरनाथच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
आपल्या डोळ्यांसमोर वाढलेली, मेहनत, जिद्द आणि स्वप्नांच्या बळावर उंच भरारी घेणारी अंबरनाथ कन्या आणि तिचे वडील प्रगती अमृततुल्यचे मालक श्री. संजय दत्तात्रय सूर्यवंशी यांची कन्या ईशा संजय सूर्यवंशी, लवकरच कलर्स हिंदी वाहिनीवरील कौटुंबिक मालिकेत आरोही शिंदे या मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे.
राजश्री प्रोडक्शनसारख्या भव्य आणि प्रतिष्ठित बॅनरअंतर्गत साकारलेली ही मालिका “मनपसंद की शादी” या नावाने ११ ऑगस्टपासून, दररोज रात्री १० वाजता कलर्स हिंदी वाहिनीवर प्रसारित झाली आहे.
राजश्री प्रॉडक्शन्स ही भारतातील सर्वात जुनी आणि सन्माननीय फिल्म निर्मिती संस्था असून ती कुटुंबकेंद्रित आणि मूल्यप्रधान कथांसाठी प्रसिद्ध आहे. या संस्थेने मैने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं, विवाह, प्रेम रतन धन पायो यांसारखे हिंदी चित्रपट दिले आहेत, जे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. संस्थेचे प्रमुख सूरज आर. बडजात्या हे ख्यातनाम दिग्दर्शक आणि निर्माता असून भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान अमूल्य आहे. अशा मान्यवर संस्थेखाली मुख्य भूमिका करण्याची संधी मिळणे ही ईशासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे.
एक मराठी मुलगी, तीही अंबरनाथ मधील अशा मोठ्या पातळीवर प्रमुख भूमिकेत झळकणे ही केवळ तिच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण अंबरनाथसाठी अभिमानाची बाब आहे. तिच्या डोळ्यांतले स्वप्न, हृदयातली जिद्द आणि अथक मेहनत आज खऱ्या अर्थाने फळास आली आहे.
ईशा सूर्यवंशी हिने सिम्बॉयसिस कॉलेज, पुणे येथून बॅचलर ऑफ आर्टस् अँड मास कम्युनिकेशन (ऍडव्हर्टायझिंग व ऍक्टिंग) पदवी घेतली. त्यानंतर अनुपम खेर यांच्या मुंबईतील फिल्म एक्टिंग अकॅडमीमधून डिप्लोमा पूर्ण केला. अंब्रोसिया थिएटर्समध्ये दोन वर्षे नाट्यप्रयोग केले. तसेच नृत्य क्षेत्रात हैदराबाद, दिल्ली, पटना, चेन्नई येथे अनेक स्टेज शो सादर केले.
चला तर मग, आपण सर्वांनी एकदिलाने तिच्या या यशस्वी प्रवासाला शुभेच्छा देऊया.
आपले प्रेम, आशीर्वाद आणि प्रोत्साहन तिला मिळू दे — जेणेकरून ती पुढेही अशाच यशाच्या शिखरावर पोहोचत राहील आणि आपल्या अंबरनाथचे नाव गौरवाने उजळवेल ईशा सूर्यवंशी हिस सर्व अंबरनाथ वासियांकडून हार्दिक शुभेच्छा. देण्यात आल्या
