अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
वंचित बहुजन आघाडी चे परतूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन
जालना जिल्हा प्रतिनिधी नामदेव मंडपे
आज दिनाक ११/८/२०२५ रोजी परतूर मंठा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करन्यात आले. परतूर मंठा तालुक्यातील विविध मागण्या साठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.दोन्ही तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांचा होत असलेला राजकीय वापर,शेतकरी कर्जमाफी,मग्रारोहयो सिंचन विहिरीना मंजुरी,यावर्षीच्या अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे,शिक्षण विभागातील चुकीच्या नेमणुका,शेत रस्ते,शिव रस्ते,पांदन रस्ते तक्रारींचा राजकीय दबावाखाली होत असलेला निर्णय व गैरकारभार,वंचित घरकुल धारकाना रेतीची उपलब्धता,मंठा मंडळ व परतूर तालुक्यातील विविध मंडळ जे गत वर्षी अतिवृष्टी लाभा पासून वंचित आहेत त्यांचा समावेश,परतूर शहरातील गुंठेवारी सुरू करणे,शहरातील स्वच्छता, व इतर समस्या सोडवणे,वाटर ग्रिड योजनेचे पाणी न पोहोचलेल्या गावाना पाणी देणे,आष्टी येथील ३.५४ कोटी पाणीपुरवठा कामातील भ्रष्टाच्याराची चौकशी करून कारवाई करणे,घरकुल लाभार्थ्यांची पिळवणूक थांबवणे,गायरान जमिनी कायम करून ७/१२ वर नोंद घेणे mregs पांदान रस्ते कामावर खडीकरणास मंजुरी देणे सृष्टी,को.हदगाव, संकनपुरी दलित स्मशान भूमीस जागा उपलब्ध करून देणे,ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोग दिव्यांग निधी चे तत्काळ वाटप करणे,व इतर मागण्या च्या पुरतते साठी हे आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्री गायकवाड साहेब यांच्याशी करून चर्चा करून निवेदन देण्यात आले. शेवटी आभार मानून आंदोलन संपले या प्रसंगी उपस्थिती
वंचित बहुजन आघाडीचे नेते श्री रामप्रसाद थोरात सर परमेश्वर खरात डॉ किशोर त्रिभुवन सुभाष जाधव जमीर शेख हेमंत पहाडे चोखाजी सौंदर्य नामदेव नाचन परमेश्वर ढवळे गौतम खंडागळे महारुद्र राऊत सुधाकर दवंडे सिद्धेश्वर राऊत सुदर्शन राऊत एकनाथराव टोणपे दत्तात्रय आव्हाड दीपक वक्ते संकेत प्रधान बालासाहेब फुलारी योगेश काते दादाराव साळवे भारत उघडे नारायण ढाकर घे ईश्वर मोरे राम चोरमारे दत्तात्रय कुलथे एकनाथ दवंडे प्रभाकर गाते रामेश्वर वंजारे रुस्तुम रणशूर काकासाहेब टोणपे प्रकाश पाडेवार भारत प्रधान विष्णू मोरे ज्ञानेश्वर भोकरे हनुमंत मोरे गुलाबराव दवंडे अशोक उमिटे सुनील सदावर्ते दत्ता घोडे राणोजी कांबळे संतोष राऊत दत्ता राऊत अर्जुन शेजुळ सिद्धार्थ कांबळे स्वप्नील पहाडे मनोज वंजारे जीवन सोनवणे दीपक दवंडे प्रभू पाईकराव प्रभाकर मुंडे दत्ता धुळे रामेश्वर वंजारे दलित मोरे बालासाहेब शेळके संदीप मोरे खंडू पाईकराव शाळीग्राम साळवे लक्ष्मण घनवट गणेश घनवट गंगाधर गायकवाड सुनील हातकडके सखाराम पाटेकर ओमप्रकाश गाढवे नितीन गाढवे दत्ता भिसे लक्ष्मण सुळे दशरथ वाहुळे राहुल प्रधान शिवाजी शेट डोळस सदाभाऊ शिरसाट भारत प्रधान दादाराव साळवे विष्णू मोरे शेषेराव धोटे शुभम केदारे अनिल गीते गौतम लगडे भीमराव गायकवाड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
