एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

लाडक्या बहीणींनी सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा : करण देवतळे

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात

 

लाडक्या बहीणींनी सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा : करण देवतळे

भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे रक्षाबंधन सोहळा संपन्न

महीलांच्या आर्थीक सक्षमीकरणाकरीता कटीबध्द : रविंद्र शिंदे

महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती

भद्रावती :दि.10:-भारतीय जनता पार्टी महीला आघाडी, भद्रावती व्दारा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचेकडून रक्षाबंधन निमित्त बहीणीसाठी देवाभाऊ विशेष उपहार सोहळा कार्यक्रमाचे स्थानिक श्री मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. आज (दि.१०) ला या सोहळ्यात उपस्थित हजारो बहीनींना रक्षाबंधन निमित्त भेटवस्तु देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार करण देवतळे तर उद्घाटक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे तसेच सहउद्घाटक म्हणून विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर होते.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करुन भारतमाता व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. विशाखा तेलरांधे यांच्या सुमधुर वाणीतून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. मंचावरील उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रामुख्याने, आमदार करण देवतळे यांनी भारत सरकार व महाराष्ट्र सरकारव्दारा चालविल्या जात असलेल्या शासकीय योजना ज्यामध्ये पंतप्रधान मातृवंदना योजना, पंतप्रधान उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत योजना, जलजीवन मिशन, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, महिला सन्मान योजना आदी योजनांवर प्रकाश टाकत लाभ घेण्याचे आवाहन केले. सोबतच अडीअडचण आल्यास निसंकोच संपर्क करण्याचे आवाहन उपस्थित बहिणींना केले. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी उपस्थित बहिणींना बँकेतर्फे सर्वपरी मदत करण्याचे आश्वासन देत बचत गटाच्या माध्यमातून महीला आर्थीक सक्षमीकरण करण्याचे पुर्ण प्रयत्न करेल असे भाषणातून प्रतिपादन केले.

रक्षाबंधन निमित्त बहीणीसाठी विशेष उपहार सोहळा कार्यक्रमात उपस्थित बहीणींनी सर्व पदाधिकारी यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला तसेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद शिंदे यांच्या सौजन्याने बहीनींना विशेष उपचाराच्या स्वरूपात अनमोल अशी ओवाळणी देण्यात आली.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तालुका प्रमुख शामसुदंर उरकुडे, देवानंद जांभुळे, शहर अध्यक्ष सुनील नामोजवार, महीला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना शेंडे, प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, महीला तालुका अध्यक्षा रक्षीता निरांजणे, शहर अध्यक्ष वृषाली पांढरे सोबतच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, कोषाध्यक्षा सुषमा शिंदे तसेच सिकंदर शेख, लता भोयर, प्रणिता शेंडे, प्रविण सातपूते, प्रविण ठेंगणे, लक्ष्मी सागर, अर्चना जिवतोडे, आशा ताजणे, सरला मालोकर तसेच गणमान्य भाजप तथा भाजुयुमो पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उल्का पदमावार, आशा ताजणे व सरला मालोकर यांनी केले तर स्वीटी नामोजवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विनोद पांढरे, प्रशांत डाखरे, इम्रान शेख, अनंत ताठे, महादेव बांगडे, गोपाल गोसवाडे, तौसीफ शेख, बबलू सैयद, गजानन बोबडे, रोशन ईखार, प्रज्वल नामोजवार, राकेश खुसपुरे व इतर कार्यकर्ते यांनी मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला. उपस्थित नागरीक, बहिणींनी भोजनाचा आस्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link