अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शालेय शिक्षण मंत्र्यांना कॉन्व्हेंट शिक्षकाचे निवेदन
महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि.10:-महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दादाजी भुसे हे चंद्रपूर ला शासकीय दौऱ्या प्रसंगी आले असता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभागाचे अध्यक्ष विवेक आंबेकर यांनी माननीय मंत्री महोदयाची भेट घेऊन कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षकांच्या समस्येबाबत त्यांना निवेदन दिले.
यात कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षकांना एमइपीएस नियमावली 1981 नुसार पूर्ण वेतन द्यावे, महिला शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतनासह प्रसूती रजा मंजूर करावी, कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांना सी एल व ई एल रजा पूर्ण दिल्या जात नाही त्या देण्यात याव्या, शिक्षक कर्मचाऱ्यांना शालेय वेळापत्रकात निर्धारित केलेल्या कामाच्या अतिरिक्त काम संस्थाचालक देत असून ते नियमानुसार करावे, शिक्षण संस्थाचालक कॉन्व्हेंट शिक्षकांना सन्मान जनक वागणूक देत नसून त्यांचे शोषण करीत आहे अशा संस्थाचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे या मागण्यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे ज्ञानमाता कॉन्व्हेंट विद्यालय नांदेड येथील शिक्षकांना औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या पूर्ण वेतनाचा निर्णय संपूर्ण राज्यात लवकरात लवकर लागू करावा असे माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांचे पत्रही माननीय शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले.
