अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
माथन येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा माथन
(ता. यावल)
दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माथन येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला आदिवासी कुलदैवत देवमोगरा माते तसेच आदिवासी जननायक धरतीआबा बिरसा मुंडा, तंट्या भील आणि इतर क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
प्राथमिक शिक्षक अजय पाडवी यांनी आदिवासी संस्कृती, बोलीभाषा आणि परंपरेविषयी मार्गदर्शन केले. तर मुखिराम बारेला व नानू बारेला यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी संस्कृती व शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. यानंतर पारंपरिक आदिवासी सांस्कृतिक नृत्य सादर झाले, ज्यात विद्यार्थी आणि गावकरी दोघांनीही उत्साहाने ठेका धरला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक हिम्मतराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच रमेश पावरा, सुरेश पावरा, प्रेमलाल बारेला, दूरसिंग पावरा, सतीश पावरा आणि समस्त गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
