एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

ऑल इंडिया पँथर सेना जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक मुक्ताईनगर येथे यशस्वी

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

ऑल इंडिया पँथर सेना जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक मुक्ताईनगर येथे यशस्वी

दीपकभाई केदार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष रोहन मेढे व युवा जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील . युवा रावेर तालुकाध्यक्ष जितू भाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनात पार पडली.

जळगाव जिल्हा प्रतिनिधी | समाधान पाटील

ऑल इंडिया पँथर सेना जिल्हा कार्यकारिणीची महत्वाची आढावा बैठक दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी मुक्ताईनगर येथे यशस्वीरित्या पार पडली. ही बैठक संघटनेचे प्रांतीय नेते दीपकभाई केदार यांच्या नेतृत्वाखाली, व जिल्हाध्यक्ष रोहन मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.आगामी स्थानिक स्वराज्य निवडूनुका जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदा संघटनेचे वतीने लढवण्यात येतील असा विश्वास कार्यत्यांनी व्यक्त केला व संघटनेच्या भविष्यातील दिशा, सामाजिक विषयांवरील धोरणात्मक भूमिका, नव्या कार्यकर्त्यांचा सहभाग व संघटनात्मक बळकटीकरण यावर सखोल चर्चा करण्यात आली. व कार्यकर्त्यांनी संघटनेबाबत आपली मतं मांडत पुढील वाटचालीसाठी सकारात्मक ऊर्जा दिली.या बैठकीस , आदित्य गजरे, शेख अब्रार, संदीप सुरडकर, श्रावण भालेराव, , सागर बावस्कर, सम्राट बोदडे, संघपाल कोंगे, जयेश दादा, ईश्वर कोचुरे, मंगल भालेराव, अमन भालेराव, सारंग शिरतुरे, प्रथमेश भास्कर, बंटी गुरचळ, ॲड. शैलेश वानखेडे, मयूर रामटेडे, अजय शेलार, भारत बारेला हे मान्यवर उपस्थित होते.
बैठकीदरम्यान संघटनेची एकसंघता, सामाजिक न्याय आणि दलित-शोषित वंचित घटकांच्या हक्कासाठी लढण्याच्या निर्धारावर भर देण्यात आला. जिल्हाध्यक्ष रोहन मेढे यांनी दीपकभाई केदार यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाचे कौतुक करत, त्यांचं मार्गदर्शन ही संघटनेची ताकद असल्याचं वक्तव्य केलं.
मुक्ताईनगर येथे पार पडलेली ही बैठक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरली असून, लवकरच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे संकेत बैठकीदरम्यान देण्यात आले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link