अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
फिरण्यासाठी वाहन चोरणाऱ्या आरोपीकडुन २ दुचाकी वाहने जप्त भारती विद्यापीठ पोलीसांची काशल्युपर्ण कामगिरी
संपादक संतोष लांडे
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांना वाहन चोराचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकातील पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे हे वाहन चोरांचा शोध घेत असताना त्यांना आरोपी नामे मोहन दिपक विश्वकर्मा, वय २५ वर्षे, रा. मुळ सावंत विहार, त्रिमुर्ती गॅरेजजवळ, कात्रज, पुणे सध्या रा. गल्ली नंबर ७, जयभवानी नगर, पौड रोड, कोथरुड, पुणे हा त्याचे ताब्यात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३७०/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) या गुन्हयातील चोरीस गेली होंडा कंपनीची शाईन दुचाकी गाडी क्रमांक MH45V5049 हिच्यासह मिळुन आल्याने त्याचेकडुन सदरची दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. त्याचेकडे केले तपासामध्ये त्याचेकडुन बावधान पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३५३/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२) या गुन्हयातील होंडा कंपनीची शाईन दुचाकी गाडी क्रमांक MH45V5049 ही जप्त करण्यात आली आहे. आरोपीकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
१. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३७०/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२) २. बावधान पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३५३/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२)
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सारे, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पूर्ण, मा. मिलींद मोहीते साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोस्मोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, निलेश सौखैरमोडे, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, यांच्या पथकाने केली आहे.
