अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकांची दारू वाहतूक करणारा संशयित गाडीसह ताब्यात..!!
496,000 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत..!!
आरती पाटील (वर्धा जिल्हा) प्रतिनिधी. वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट कार्यालयातील अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी नेहमीच प्रयत्नशील असतात. आज दिनांक
दि 11/08/25 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट वर्धा यांच्या पथकांतील पो उप पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक अजय अवचट,पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे ,पोलीस हवालदार उमेश लडके, पोलीस हवालदार सतिश घवघवे, पोलीस हवालदार चेतन पिसे, पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, यांना दोन इसम हे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर क्रमांक MH 35 P 4532 मध्ये कळंब येथून अवैध देशी व विदेशी दारू घेऊन वडनेर कडे येणार आहे अश्या खाञीशीर खबरे वरून मौजा वडनेर येथील आजनसरा चौक येथे पंच व पो.स्टॉप सह नाकेबंदी करून खबरेप्रमाणे अवैध देशी व विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या पांढऱ्या गाडीला थांबण्याचा इशारा दिला असता कार चालकांनी त्याच्या ताब्यातील कार थांबवून त्याच्याकडील कारचा दरवाजा उघडून आरोपी हिरा कोहचाडे, राहणार कळंब, जि यवतमाळ हा शेत शिवारांतून पडून गेला व एक इसम हा कारच्या ड्रायव्हर सीट च्याबाजूला मिळून आला त्यास त्याचे नाव विचारले असतात त्याने पवन संजय महल्ले (वय 20) रा. दत्त रोड ,कळंब जिल्हा यवतमाळ) असे सांगितले, वरून जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट vdi कार क्रमांक MH 35 P 4532 किंमत 4,00,000/ व देशी/विदेशी दारू किंमत 96,000/ रु असा जु की 4,96,000/- रु चा माल मिळून आल्याने , पो स्टे, वडनेर येथे परत येवुन आरोपी विरूध्द गुन्हा नोंद केला ……
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधिक्षक वाघमारे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट सुशील कुमार नायक यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सा. हिंगणघाट यांचे कार्यालयातील . पो.उप.नि अजय अवचट,पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, पोलीस हवालदार चेतन पिसे, पोलीस हवालदार उमेश लडके, पोलीस हवालदार सतीश घवघवे,पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, गोविंद हदवे व अनंत हराड आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.
