क्रांतिवीर धोंडू केशव देसाई यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन.
प्रतिनिधी मुकूंद मोरे
हुतात्मा भाई कोतवाल यांच्या क्रांती लढ्याचे शूर शिलेदार अंबरनाथ येथील क्रांतिवीर धोंडू केशव देसाई यांच्या जीवनावर आधारित चरित्र ग्रंथाचे प्रकाशन अंबरनाथ येथील रोटरी क्लब हॉल मध्ये मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
पीपल्स पब्लिकेशन मुंबई प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला शरद भगत,प्रा.विजय कोंडीलकर, अनुसया बाई जामघरे,किसन तारमले,किशोर देसाई,वाळेकर मैडम,अप्पा मालुसरे,गिरीश कंटे आणि तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजकुमार कडव यांनी तर प्रास्ताविक दीपक घिगे यांनी केले, प्रा.विजय कोंडीलकर यांनी क्रांतिवीर धोंडू देसाई यांच्या जीवनाचे विविध अंग उलगडून दाखवले.
क्रांतिवीर धोंडू केशव देसाई यांचे नातू संग्राम देसाई यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते,ह्या वेळी स्वातंत्र्य सैनिकांचे नातू पवन कोतवाल,स्वराज पाटील,योगेश शेलार,कैलास तरे,जय हरी भोईर, यांचे सत्कार करण्यात आले.
