अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
“राखीच्या माध्यमातून स्नेहबंध”
चिमुकल्या मुलींनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना बांधली राखी .
प्रतिनिधी -सारंग महाजन
अहिल्यानगर – समाजाचे रक्षण करणाऱ्या आपल्या भावांप्रति कृतज्ञता व्यक्त करत, स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सोबत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. यावेळी छावणी परिषद अंतर्गत येणाऱ्या पीएमश्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळेतील इ.५ वी व ६ वीच्या विद्यार्थिनींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना राख्या बांधून त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला. यावेळी ‘स्नेहबंध’चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, उपअधीक्षक अमोल भारती, नासिक चे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मयूर चरखा, गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक जगदीश भांबळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहा.पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, शिक्षिका सिमा चोभे, सुप्रिया खामकर, ईशानी खामकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, “या चिमुकल्या बहिणींनी बांधलेली राखी हि केवळ एक धागा नसून, समाजातील प्रत्येक भगिनींच्या सुरक्षिततेची आणि त्यांच्या स्वरंक्षणाची जबाबदारी आहे. या राख्या आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची प्रेरणा देतात.” या कार्यक्रमाचे कौतुकही केले.
यावेळी पोलीस अधीक्षक घार्गे म्हणाले, “अशी सुंदर परंपरा शालेय विद्यार्थिनींच्या माध्यमातून जपली जाते, हे अतिशय प्रेरणादायक आहे. समाज आणि पोलिस यांच्यातील स्नेह वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे.”
( चौकट )
“रक्षाबंधनाचा सण हा केवळ भावा-बहिणीचा नसून, सामाजिक सलोखा आणि परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे. समाजात सुरक्षा आणि प्रशासनाचे काम करणाऱ्या या दोन्ही महत्त्वाच्या व्यक्तींना राखी बांधून आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत. यातून लहान मुलींनाही सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल.”
या कार्यक्रमामुळे जिल्हा प्रशासन, पोलीस दल आणि सामान्य नागरिक यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल.
डॉ. उद्धव शिंदे -अध्यक्ष स्नेहबंध फौंडेशन.
( फोटो ओळ )
‘स्नेहबंध’ तर्फे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात रक्षाबंधन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, पोलीस उपअधीक्षक मयूर चरखा, उपअधीक्षक किरणकुमार कबाडी, सिमा चोभे, सुप्रिया खामकर, ईशानी खामकर.
