अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कर्तव्य दक्ष पोलीस व वाहतूक विभाग यांच्यासमवेत रक्षाबंधन सोहळा संपन्न.
प्रतिनिधी अनंत वांजळे
काल दिनांक १०/८/२०२५ रविवार रोजी विश्व हिंदू परिषद,बजरंग दल वारजे माळवाडी प्रखंडातर्फे मातृशक्ती – दुर्गावाहिनी आयमांतर्गत भागातील वारजे माळवाडी पोलिस स्टेशन, रामनगर पोलीस चौकी, वारजे वाहतूक विभागाला भेट देऊन कर्तव्यदक्ष पोलीस बांधवांना रक्षाबंधन करण्यात आले.
अहोरात्र तत्पर राहून समाजातील प्रश्न सोडविणे तसेच आपल्या समाजाचे, संस्कृती चे कटिबद्धपणे रक्षण करण्याचे काम आपले पोलिस बांधव करत असतात त्याच बरोबर वेळोवेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल च्या बजरंगींनाही मोलाचे मार्गदर्शन त्याचबरोबर सहकार्य करत असतात. त्यामुळे ही राखी समाज रक्षणाची, गुण्यागोविंदाची व आपल्या धर्मसंस्कृतीचे रक्षणकर्ता असल्याकारणाने मातृशक्ती व दुर्गांकडून सर्व पोलिस बांधवांना बांधण्यात आली. व समाजातील किंवा आपल्या भागातील एक जागृत नागरिक व बजरंगी म्हणून जे पण सहकार्य पोलिस बांधवांना लागेल ते आम्ही करू असा विश्वास आपल्या बजरंगी यांनी पोलिस बांधवांना दिला व रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाचा समारोप केला.
आपले नम्र,
विश्व हिंदू परिषद,बजरंग दल
दुर्गावाहिनी – मातृशक्ती
वारजे माळवाडी प्रखंड
छ.संभाजी महाराज भाग
प्रतिनिधी – अनंत दत्तात्रय वांजळे.
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज
