अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शिवसेनेचा इतिहास संघर्षाचा आहे-तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे
प्रतिनिधी नामदेव मंडपे
तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांच्या हस्ते किर्ला व महोदरितांडा शिवसेना शाखांचे भव्य उद्घाटन
शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य
मंठा प्रतिनिधी: तालुक्यातील शिवसैनिकांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. किर्ला व महोदरितांडा येथे नव्याने उभारलेल्या शिवसेना शाखांचे भव्य उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. पाटील बोराडे, व शिवसेना नेते प्रल्हादराव बोराडे यांच्या सर्वसमावेशक मार्गदर्शनाखाली पार पडले.
कार्यक्रमास आध्यक्ष मा सभापती संतोषराव वरकड,तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसभापती किसनराव मोरे,तुलशीराम कुहीरे हे होते ,या वेळी उपस्थित युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश गंणगे,उप तालुका प्रमुख रामराव वरकड,अक्षयदिप वाघमारे,बालासाहेब देशमुख,भिमराव वाघ,विलासराव राठोड,उप शहर प्रमुख अमोल विरकर,सचीन गायकवाड,फिरोज पठान,अजय खंदारे,दादाराव खंदारे,अजय गायकवाड,यांची विशेष उपस्थिती होती. उद्घाटन सोहळा पारंपरिक वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात, भगवे झेंडे फडकवत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. कार्यकर्त्यांनी “जय शिवराय”, “हर हर महादेव” आणि ” एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
शाखांचा उद्घाटनप्रसंगी बोलताना उदयसिंह बोराडे म्हणाले,”शिवसेना ही केवळ राजकीय पक्ष नाही, तर ती एक विचारधारा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ग्रामीण भागातील जनतेसाठी लढा देत आहोत. आज या किर्ला व महोदरितांडा शाखांचे उद्घाटन म्हणजे केवळ इमारत उभारणे नाही, तर गावागावात शिवसेनेचा किल्ला भक्कम करणे आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने गावातील जनतेच्या समस्या आपल्याच घरच्या समस्यांप्रमाणे सोडवाव्यात, लोकांच्या अडचणींना न्याय मिळवून द्यावा, हाच खरा आपला उद्देश आहे.
“शिवसेनेचा इतिहास संघर्षाचा आहे, त्यात कोणतेही बलिदान देण्यास आम्ही कधीही मागेपुढे पाहिले नाही. आमच्यासमोर काहीही अडथळे आले तरी, शिवसैनिक डगमगणार नाहीत. गावोगाव आपली संघटना सक्षम करण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे. पुढील काळात मंठा तालुक्यातील प्रत्येक गावात भगवा झेंडा फडकवून राहील, ही माझी खात्री आहे
