अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी मुकुंद मोरे
रक्षाबंधनाच्या दिवशी नागरिकांना ट्रॅफिकचं आंदण आहे.. वर्षानुवर्षे तोच रस्ता.. तेच ट्रॅफिक.. तीच घुसमट आणि तीच मागणी.. आता आम्हालाही त्याच त्याच मुद्द्यावरून सरकारला शालजोडीत द्यायला लाज वाटू लागली आहे पण यांना नागरिकांच्या जीवाची, वेळेची आणि जीवनाची काहीही एक पडलेली नाही.. रस्ते रुंदीकरण केले, कितीतरी ब्रिज बांधले.. त्याचा मलिदा खाऊन झाला.. पुन्हा रस्ते आणि पूल दुरुस्त करण्याची वेळ आली.. म्हणजे पुन्हा मलिदा खाण्याची संधी उपलब्ध झाली.. पण ट्रॅफिक चा प्रश्न काही केल्या या आमच्या ‘बालकमंत्र्याला’ सोडवता येत नाही.. कारण या भ्रष्टनाथ मलिदा खाणाऱ्यांसाठी चॉपर आहेत.. हवाईमार्ग आहेत.. रस्त्यावरून जायची वेळ आली तर नागरिकांना थांबवून यांच्या गाड्यांसाठी रस्ता मोकळा करणारे ट्रॅफिक कंट्रोलर आहेत.. पण सामान्य माणसाचं काय ? कल्याण डोंबिवलीकरांचं अर्ध आयुष्य या ट्रॅफिक च्या गर्दीतच सुरु होणार आणि या गर्दीतच संपणार ! हे सत्ताधारी मात्र या टक्केवारीतून ओरबाडलेला पैसा वाटून दुसऱ्यांचे पक्ष फोडून आपली गद्दार गॅंग वाढविण्यात मग्न राहणार.खरंतर आश्चर्य मला त्या लोकांचे वाटते ज्या लोकांना त्रास होतो
