अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
घाटकोपर पश्चिम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्र१२६ या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मिंटीग आयोजित करण्यात आली
प्रतिनिधी मुकूंद मोरे
पोलादपूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई मधील सर्व निष्ठावंत शिवसैनिक पदाधिकारी व युवासैनिक पदाधिकारी आढावा बैठकीला उपस्थित राहून संवाद साधला. पोलादपूर तालुका सर्व सहसंपर्कप्रमुख उपस्थितीत होते मीटिंगचे विषय विधानसभा निवडणूक झाल्यापासून आपली मुंबई मध्ये एकही मीटिंग झाली नाही वरिष्ठ पातळीवर सुध्दा भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने काही हालचाली दिसत नाहीत आपण सर्वजण आतापर्यंत निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलो आपल्यासाठी या पुढचा काळ अजून कठीण आहे एकेकाळी पोलादपूर तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या तालुका पण आज परिस्थिती खूप वेगळी आहे अनेकजण आपला राजकीय मार्ग वेगळा शोधत आहे म्हणून शिवसैनिकांची संघटना बांधणी करण्यात आली आहे या अनुषंगाने मीटिंग उत्तम प्रकारे पार पडली.
