अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
रोटरी क्लब तर्फे पुणे विद्यार्थी गृहामध्ये रक्षाबंधन कार्यक्रम साजरा
पुणे प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
आज पुणे विद्यार्थी गृहामध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे, कात्रज – टिळक रोड – Mid east या तीन रोटरी क्लब तर्फे, तेथील राम मंदिरात रक्षाबंधन कार्यक्रम साजरा झाला. या प्रसंगी वसतिगृहामधील दहावीपर्यंतच्या सुमारे 100 विद्यार्थ्यांना औक्षण करून राखी बांधण्यात आली. तसेच त्यांना भेटवस्तू – वह्या, पेन्सिल कलर बॉक्स, पाउच व नाश्ता देण्यात आला. रो. चित्राताई यांनी स्वतः घरी केलेले रव्याचे लाडू सर्व मुलांना देण्यात आले. भेटवस्तू व इतर सगळं कार्यक्रमाचं संयोजन आपल्या क्लबा तर्फे रो. नमिता नाईक यांनी केले. *क्लबच्या सर्व लेडीजनी या कार्यक्रमासाठी आर्थिक सहभाग दिला*. तसेच कार्यक्रमाला उपस्थित सर्व रोटेरीयन्स व अँन्स, आरसीसी श्री कोरडे, श्री. कांता राठोड, विविध क्लबचे Rotractors यांनी कार्य तत्परता दाखवल्याने समारंभ सुसूत्र झाला. रो. अभय भिसे यांनी फोटो काढले. रो. आरती पायगुडे यांना क्लब तर्फे राम मंदिरामध्ये वाढदिवस शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे President Rtn. Roshan, RC Mideast यांनी केलेले अपील.. तेथील मुलांनी उपस्थित एकेका लेडीज चे – नवीन बहिणींचे फोन नंबर घेतले. आता त्यांना पुण्यामध्ये एक हक्काचे बहिणीचे नाते व घर मिळाले आहे. सर्व बहिणींनीही आनंदाने हे बंधन स्वीकारले आहे.
सर्वांना ( All present RCPK members, anns and PPs) मनापासून धन्यवाद आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
