अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी रितेश सणस
विजय महोत्सव : शौर्य, सेवा आणि समर्पणाचा संगम
महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् आयोजित क्रांती प्रेरणा पुरस्कार २०२५
विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते भव्य सन्मान सोहळा संपन्न
पुणे, ८ ऑगस्ट – स्वातंत्र्याच्या इतिहासात ‘ऑगस्ट क्रांती दिन’ आणि ‘कारगिल विजय दिन’ हे दोन दिवस भारतीय जनतेच्या मनात सदैव कोरलेले आहेत. याच प्रेरणेतून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस, आझाद फाउंडेशन, टाईम्स ऑफ पुणे आणि सुमीत चौधरी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “क्रांती प्रेरणा पुरस्कार २०२५” हा भव्य सन्मान सोहळा पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड येथे देशभक्तीमय वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाचा उद्देश केवळ सन्मान करणे नव्हता, तर पुढच्या पिढीपर्यंत कारगिल युद्धातील शौर्यगाथा आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची प्रेरणा पोहोचवणे हा होता. १९९९ च्या कारगिल युद्धात भारतीय सैन्याने -५०° तापमान, १७,००० फूट उंचीवरील रणांगण आणि प्रखर गोळीबारात विजय मिळवला होता. त्या लढाईत ५२७ जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले, तर हजारो जवान जखमी झाले या त्याग, पराक्रम आणि बलिदानास मानवंदना देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते झाले.
आपल्या भाषणात त्यांनी सांगितले –
“हा सोहळा म्हणजे भूतकाळातील क्रांतीची आठवण, वर्तमानातील देशसेवेचा गौरव आणि भावी पिढीसाठी प्रेरणेचा अद्वितीय संगम आहे.”
सोहळ्यात कारगिल युद्धातील वीर, माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबियांसह समाजसेवक, पत्रकार, शिक्षण, आरोग्य, प्रशासन आणि कलेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. रामदास मदने (कारगिल युद्ध नायक), कमांडर बलवंत सिंग, दीपक राजे शिर्के (सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष) अशा सैन्य दलात पराक्रम गाजवलेल्या माजी सैनिकांची प्रमुख उपस्थित या कार्यक्रमाची मुख्य आकर्षण ठरली.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पूर्व शहर अध्यक्ष सुनील टिंगरे, भूमाता ब्रिगेड च्या संस्थापिका तृप्ती ताई देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, बहुजन समाज पक्षाचे नेते हुलगेश चलवादी, यांच्या प्रमुख उपस्थित हा सन्मान सोहळा पार पडला
सोहळ्यात गगनभेदी ‘जय हिंद’च्या घोषणा, देशभक्तिपर गीते आणि विशाल संपूर्ण आरोग्य संस्था तसेच ज्येष्ठ नागरिक नवचैतन्य हास्य मंडळ यांच्या विशेष सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले.
या वेळी संस्थे चे अध्यक्ष आदम सय्यद यांनी सर्व उपस्थित पुरस्कार्थी ,माजी सैनिक,आणि मान्यवरांचे आभार व्यक्त केले, आणि भावना व्यक्त करताना सांगितले कि, कारगिल युद्ध हे भारतीय सैन्याने सर्वात कठीण भौगोलिक व हवामानाच्या परिस्थितीत जिंकलेले अभिमानास्पद युद्ध आहे, भारतीय सैन्य दलाची ताकत आणि शौर्याची दखल संपूर्ण जगाने घेतली, त्या मुळे आपल्या येणाऱ्या पिढीला हि शौर्य गाथा माहित व्हावी म्हणून कारगिल विजय दिवस आपण मोठ्या उत्सहाने साजरा केला पाहिजे.
या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुमीत चौधरी, सतीश राठोड, स्नेहा कुलकर्णी, साहिल शेख, अनिल घारे यांच्या अथक प्रयत्नांची मोठी भूमिका राहिली.
