अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कासवे शिवारात बिबट्याचा बकरीवर हल्ला; बकरी जखमी
पाडळसे (ता. यावल) | वार्ताहर – येथील पाडळसे-कासवे शिवारात एका बिबट्याने भरदिवसा पाडळसे येथील दिलीप हरचंद तायडे यांच्या बकरीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. बकरी पालकाने वेळीच आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने पळ काढला, मात्र या हल्ल्यात बकरी जखमी झाली आहे.
ही घटना दि.८रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. बिबट्याने अचानक बकरीच्या कळपावर हल्ला चढवला. बकरीवर हल्ला होताच बकरी मालकाने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. माणसाचा आवाज ऐकून बिबट्या घाबरला आणि त्याने घटनास्थळावरून धूम ठोकली.
या हल्ल्यात एक बकरी जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी फैजपूर विभागाचे राऊंड ऑफिसर अतुल तायडे पाडळसे पोलीस पाटील सुरेश खैरनार यांनी पाहणी करून पंचनामा केला या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या परिसरात गस्त वाढवावी आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी सातत्याने करत आहे वारंवार पशुधनावर बिबट्या हल्ला करत असल्याने पशुपालक व शेतकरी धास्तावले आहेत
