अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुले नगर येथील 31 विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप.
शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : दि.9 ऑगस्ट रोजी
शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुले नगर ( हमालवाडी) येथील विद्यार्थांना 9 ऑगस्ट क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त 31 शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले .
या उपक्रमाचे संयोजक सुनील गायकवाड यांनी हात मदतीचा तुमच्या आमच्या सहकार्याने या उपक्रमांतर्गत 31 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले .या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक विठ्ठल सिंह ठाकुर, पद्माकर वाकडिकर, अभियंता सुयश नाईकवाडे, संयोजक सुनील गायकवाड, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालूका अध्यक्ष सतिश जाधव, निर्मिक क्लासेस चे संचालक शुकाचार्य शिंदे, देवेंद्र आन्ना कुरा, मुख्याध्या पक भुजंगराव थोरे उपस्थितीत होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील गायकवाड सूत्रसंचालन भुजंगराव थोरे तर आभार प्रशांत महाराज चव्हाण यांनी मानले.
