अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
विश्वकर्मा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सत्कार सोहळ्याचे आयोजन
तालुका प्रतिनिधी धर्माबाद
सज्जन संतोष
धर्माबाद दि 8 विश्वकर्मा सेवा संघ नांदेड च्यावतीने विश्वकर्मा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सत्कार सोहळा रविवार दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. विश्वकर्मा समाजातील विद्यार्थी गुणवत्ता वाढावी समाजातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात अव्वल यावेत यासाठी दरवर्षी विश्वकर्मा सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन प्रेरणा व मान्यवरांकडून योग्य दिशादर्शक मार्गदर्शन या सोहळ्याच्या माध्यमातून दिले जाते. नांदेड जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील गुणवंत विद्यार्थी शेकडोंच्या संख्येने दरवर्षी यासोहळ्यासाठी उपस्थित राहतात.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र ए टी एस पोलीस निरीक्षक नांदेड मा. रमाकांत पांचाळ , उदघाटक मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. सुनील वेदपाठक हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख मार्गदर्शक नांदेड महानगरपालिका नांदेड मा. डॉ. महेशकुमार डोईफोडे, प्रमुख अतिथी सहाय्यक आयुक्त मा. शिवानंद मिनगीरे हे असणार आहेत. याचसोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना शिल्पकार गुरुवर्य सोपानकाका शूर दहावी १-बारावी १ प्रथम दोन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५५०० /- शिष्यवृत्ती, कै.धोंडिबाराव नागोबा पोलादवार शिष्यवृत्ती दहावी १-बारावी१ द्वितीय दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३०००/- रुपये, कै किशनराव मारुतीराव उजळंबकर तृतीय बक्षीस ११००/- रुपये दहावी १ व बारावी १ व यासहाही विद्यार्थ्यांना कै. लक्ष्मणराव शिवलिंगराव देशमुख अंबुलगेकर, यांच्या स्मरणार्थ स्कुलबॅग भेट देण्यात येणार आहेत.गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सत्कार पात्र विद्यार्थी दहावी उत्तीर्ण ७५% व त्यापेक्षा अधिक गुणवत्ता धारक, बारावी ७०% व त्यापेक्षा अधिक गुणवत्ता धारक, युपीएससी निवड विद्यार्थी २०२५, एमपीएससी निवड विद्यार्थी २०२४-२५, MBBS व BAMS निवड विद्यार्थी २०२५, इंजिनिअरिंग निवड विद्यार्थी २०२५ असणार आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणीसुध्दा केली आहे. यासत्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गुणपत्रिकेसह उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यातआलेआहे समाजासाठी व मानव कल्याणासाठी विशेष योगदान येणाऱ्या व्यक्तीस समाजभूषण पुरस्कार’ तर अत्यंत कठीण परिस्थितीत पतीच्या अकाली निधनानंतर आपल्या मुलांना शिक्षण, कला, क्रीडा, उद्योग, व्यापार व राजकीय क्षेत्रात उत्तुंग झेप घेण्यासाठी सक्षम बनवणाऱ्या समाजातील आदर्श मातांना ‘हिरकणी पुरस्कार’ देऊन यासोहळ्यात करण्यात येणार आहे.वधुपिता व वरपिता यांच्या सोयी साठी उपवर-उपवधु परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासोहळ्यासाठी विश्वकर्मा समाजातील अधिकाधिक समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन विश्वकर्मा सेवा संघ जिल्हा नांदेड च्यावतीने करण्यात आले आहे.
तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष
