अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयामध्ये रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न.
मानवत / वार्ताहर
———————————————
मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या ,नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये आज ईको- फ्रेंडली रक्षा बंधन पेठ मोहल्ला शाखेत मा. बाबासाहेब तेलभरे सर यांच्या मार्गदर्शनाखाले संपन्न झाले यावेळी सुभान शहा सर कैलास अबूज सर यांनी शालेय मुलांना या प्रसंगी रक्षाबंधनाचे महत्व पटवून दिले.
सविस्तर वृत्त असे की, मानवत शहरातील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालय पेठ मोहल्ला शाखेत आज इकोफ्रेंडली रक्षा बंधन घेण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक बाबासाहेब तेलभरे यांनी या प्रसंगी विशेष सहकार्य केले तर सुबान शहा सर,यांनी रक्षाबंधन या विषयी मार्गदर्शन करून मनोगत व्यक्त केले तर कैलास अबूज सर यांनी बहिन – भावांच्या अत्यंत नाजूक व जिव्हाळ्याच्या नात्या संबंधी विशेष माहिती विशद करून मूलांना नाते संबंधी मार्ग दर्शन केले या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी रक्षाबंधन सोहळा कार्यक्रमाला मुख्याध्यापक अनिल चव्हान यांनी शुभेच्छा दिल्या.
