अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
तूम जिओ हजारो साल
मानवतकरासह पोलीस प्रशासनाकडून जिल्हा पोलीस अधिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव
मानवत / वार्ताहर.
परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष व जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले पोलीस अधीक्षक रविंद्रसिंहजी परदेशी यांच्या वाढ दिवसानिमित्त मानवत पोलीस प्रशासनाच्या वतीने मानवत स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी शुभेच्छा दिल्या.
सहाय्यक पोलिस निरक्षक संदीप बोरकर यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, *“रविंद्रसिंहजी परदेशी* यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यात उल्लेखनिय यश मिळाले आहे.
त्यांचा लोकाभिमुख दृष्टिकोन व कार्यतत्परता पोलिस दलासाठी प्रेरणादायी आहे.”
जिल्ह्यातील गुन्ह्यांची जलद उकल, गुन्हेगारीवर नियंत्रण व जनतेशी सुसंवाद साधण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे नागरिकांचा पोलीस प्रशासनावर विश्वास अधिक दृढ झाला आहे. त्यांच्या वाढ दिवसानिमित्त या प्रसंगीपोलिस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व मानवत शहरातील नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
