अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सत्तेचे हस्तांतरण म्हणजे स्वातंत्र्य नव्हे; स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घ्या_पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलूत वसंत प्रतिष्ठान च्या‘व्याख्यानमालेत विश्वगुरु भारत’ विषयावर व्याख्यान.
सेलू : दि.08 ऑगस्ट आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य सहजसाध्य नाही. प्रत्येक हिंदुस्थानवासीयाने त्याचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. केवळ सत्तेचे हस्तांतरण म्हणजे स्वातंत्र्य नव्हे, असे प्रतिपादन दिल्ली येथील प्रख्यात पत्रकार व प्रखर राष्ट्रभक्त पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले.सेलू येथील वसंत प्रतिष्ठानच्या वतीने माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ विधीज्ञ, श्री.के.बा. शिक्षण संस्थेचे तत्कालीन सचिव कै. वसंतराव खारकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सेलू शहरातील येथील साई नाट्यगृहात शुक्रवारी (दि.08) ‘विश्वगुरु भारत’ या विषयावर पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता आणि कै. अॅड. वसंतराव खारकर यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी श्री के.बा. शिक्षण संस्थेचे सचिव व वसंत प्रतिष्ठानचे महेशराव खारकर, अॅड. उमेशराव खारकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सच्चिदानंद डाखोरे व पूजा तोडकर यांनी ‘वंदे मातरम’ गीताने कार्यक्रमास सुरुवात केली. प्रास्ताविक महेशराव खारकर यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय प्रकाश कुरुंदकर यांनी करून दिला. यावेळी कुलश्रेष्ठ म्हणाले, इंग्रज गेले तरी त्यांच्या काळातील कायदे, नियम आजही लागू आहेत. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला,पण दिल्लीच्या रस्त्यावर लाखो मृतदेह पडले होते. पाकिस्तानला 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणे ही शरमेची बाब आहे. साडेदहा लाख हिंदूंच्या हत्येनंतर पाकिस्तान तयार झाला, तरीही काही राजकारणी त्यांना शुभेच्छा देतात,ही शरमेची बाब आहे, असे ते म्हणाले. जो पर्यंत इतिहासाचा अभ्यास आपण करणार नाहीत तोपर्यंत आपले वर्तमान चांगले राहणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. कुलश्रेष्ठ यांनी पुढे बोलताना स्वातंत्र्यपूर्व काळातील घटना, सध्याच्या भारतातील परिस्थिती, भारतीयांची मानसिकता आणि कर्म यांचा आढावा घेत ‘भारत विश्वगुरू कसा आहेश हे स्पष्ट केले. ते म्हणाले, साडेदहा लाख हिंदूंच्या हत्येनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. तरीदेखील आपल्याकडील काहीराजकारणी त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतात, ही शरमेची बाब आहे. हिंदूंच्या हातात सत्ता असतानाही काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी काश्मिरी पंडितांना हाकलून दिले, गोळ्या घालून ठार केले, हे दुर्दैव नाही का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरुद्ध घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी परखड टीका केली. भारता विरुद्ध बोलण्याची हिम्मत होतेच कशी? आपण जर खंबीरपणे एकत्र आलो नाही, तर असे प्रकार घडत राहतील. त्यामुळे सनातनी हिंदूंनी विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत सनातनी हिंदू व्यवस्था अस्तित्वात आहे, तोपर्यंत आपले भविष्य उज्ज्वल आहे, असे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले, देशाला सरकार चालवत नाही, तर समाज चालवतो आणि तो समाज सशक्त हवा. भारत कधीच जातीवादी नव्हता; तो कर्मवादी होता. पण इंग्रजांनी सर्वप्रथम जातीभेदाचे विष भारतीयांच्या मनात भिनवले आणि स्वातंत्र्या नंतर राजकारण्यांनी त्यालाच खतपाणी घालून आपली पोळी भाजून घेतली. मात्र या सगळ्याचा फटका समाजालाच बसला. मतदान आणि धर्म या संकल्पनांचे चुकीचे अर्थ लावले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. शेवटी, संपूर्ण भारत हा विश्वगुरू आहे, हे त्यांनी पटवून दिले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन निलेश बिनायके यांनी केले, तर आभारप्रदर्शन ऍड. उमेश खारकर यांनी केले.
