अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांकरीता रक्षाबंधन कार्यकम मोठ्या उस्ताहात संपन्न
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
दिनांक ०९/०८/२०२५
——————————————-
मा. श्री. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक,कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. श्री. योगेश देसाई, कारागृह विशेष महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, पूर्व विभाग, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहातील बंद्याकरिता विविध कल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत. आज दिनांक ०९/०८/२०२५ शनिवार रोजी रक्षाबंधन सणा निमित्त्याने,नागपूर हाउसेस ऑफ मेरी इम्माकुलेट संस्था नागपूर, व श्रीमती मंदाताई वैरागडे सेवाभावी बहुउद्देशीय संस्था नागपूर यांचे माध्यमाने कारागृहातील बंदी बांधव यांचेकरिता रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
*रक्षाबंधन हा पावसाळी सण आहे, ज्याचा अर्थ खोलवर आहे, पावसाळा जीवनात नव चैत्यन्य निर्माण करतो. हा ऋतू आपल्याला समृद्धी आणि जीवनाचा पूर्ण आनंद घेण्यासाठी एक नवीन आशा देतो. म्हणूनच श्रावण महिना भावंडांमधील प्रेमाचा निर्दोष बंधनाचा आणि सौभाग्याच्या आगमनाचा उत्सव साजरा करण्यासाठी रक्षाबंधन हा पवित्र दिवस मानला जातो, हा सण केवळ रक्ताच्या नात्यातील भाऊ – बहिणीसाठीच नाही, तर मित्र आणि इतर समाजातील सदस्यामध्ये साजरा केला जातो, त्यामुळे समाजात प्रेम आणि ऐक्य वाढतोय म्हणूच आज या स्वयंसेवी संस्था च्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या करिता रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. असे मा. वैभव आगे, अधीक्षक नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर यांनी संबोधित केलेत.
नागपूर मध्यवर्ती कारागृहातील महिला बंद्यांनी सुरेख / सुंदर / राख्या बनविलेल्या असून सदरील राख्या विक्रीसाठी कारागृहा बाहेरील विक्री केंद्रात ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच कारागृह निर्मित राख्या सदरील संस्था यांनी खरेदी केलेल्या आहेत.
सदरील संस्थाच्या माध्यमाने आलेल्या सिस्टर व विद्यार्थी व महिला सदस्य यांनी प्रथम एकत्रितपणे आरती ओवाळणी करून बंद्यांना राख्या बांधण्यात आले, दरम्यान कारागृह अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा राख्या बांधण्यात आले. दरम्यान राखी संबंधित गीत गायन करण्यात आले.
सदरील रक्षाबंधन कार्यक्रम प्रसंगी श्री. वैभव आगे, अधीक्षक, नागपूर मध्यवर्ती कारागृह नागपूर, श्री. श्रीधर काळे, उपअधीक्षक, श्री. आनंद पानसरे, वरिष्ठ तुरुंगअधिकारी, श्री. मनोहर भोसले ,वरिष्ठ तुरुंगअधिकारी, श्री.भीमराव राऊत, वरिष्ठ तुरुंगअधिकारी,श्री.बी.बी. शिंदे, वरिष्ठ तुरुंगअधिकारी ,श्री. एन. एस. क्षीरसागर वरिष्ठ तुरुंगअधिकारी,प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर हाउसेस ऑफ मेरी इम्माकुलेट संस्था नागपूर चे अध्यक्षा सिस्टर वनिता जॉन, सिस्टर वेरोनिका, सिस्टर कल्पिका, सिस्टर मेघा, सिस्टर भावना, श्रीमती. बरनाडेट फ्रान्सिस, कु. गायत्री, कु. मानसी, कु.जस्टीना, कु. रोजमेरी, कु. पूर्वी, कु. प्रशंसा, कु. छकुली, कु. अॅड्रीना, कु. ग्रेसी, कु. डेल्फीन, कु. तेरेसा, कु. रेचल, कु. जरीना इत्यादी महिला सदस्यांनी बंद्यांना राख्या बांधून आशीर्वाद दिल्यात.
या कार्यक्रमच्या विशेष यशस्वीतेसाठी मीना लाटकर, सामाजिक कार्यकर्ता श्री. धनपाल मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता, श्री. कृष्णा पाडवी, सामाजिक कार्यकर्ता. श्री. गणपत खोकले, कारागृह शिक्षक ,श्री. पंकज बुरडकर , संजय गायकवाड, हवालदार व कारागृह कर्मचारीवर्ग यांनी अथकपणे सहकार्य केले
