अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नारळी पौर्णिमा, कोळी बांधवांच्या उत्साहाला उधाण आणणारा सण!
नारळी पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण सर्व कोळी बांधवांच्या उत्साहाला उधाण आणणारा सण
प्रतिनिधी मुकूंद मोरे
वरळी कोळीवाडा येथे कोळी बांधवांकडून पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला. ह्याप्रसंगी त्यांच्या आनंदात युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे सहभागी झाले. तसेच कोळी बांधवांच्या भरभराटीसाठी दर्या सागराला साकडं घालून, त्यांना सर्वांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
ह्यावेळी शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, आमदार सुनिल शिंदे, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
