अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अग्निशमन दलातील जवानांच्या हातावर राखी बांधून रक्षाबंधन उत्साहात संपन्न
कार्यकारी संपादक किरण सोनवणे
वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या वतीने अग्निशमन दलातील जवानांसाठी रक्षाबंधन व सुरेल संगीताचा सोहळा लोहिया नगर येथील अग्निशमनदल मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. हे जवान स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मानव, प्राणी, मालमत्ता व देशसंपत्तीचे संरक्षण करतात. आगीची माहिती मिळताच हे जवान अपघात स्थळी धाव घेऊन लोकांचे जीव वाचवतात.
फायर ब्रिगेड जवान दिवस रात्र देशसेवा करत आहेत त्यामुळे आपण आनंदाने जीवन जगत आहोत म्हणूनच या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा योगिता गोसावी गेली अनेक वर्षे सातत्याने महिलांना सोबत घेऊन अग्निशमन दलातील ह्या जवानांच्या हातावर राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करतात. ह्यावर्षी पण महिलांना सोबत घेऊन रक्षाबंधन सोहळा साजरा करत असताना फायर ब्रिगेड ऑफिसर वायकर सर मनोगत व्यक्त करताना बोलले की देशसेवेचे हे कर्तव्य निभावत असल्याने आम्हाला कोणताच सण साजरा करता येत नाही आज तुमच्यामुळे आमचा रक्षाबंधन सोहळा आनंदात पार पडला. गायक मुर्तुजा शेख व बाबुराव सुगंधी यांनी या रक्षाबंधन सोहळ्याला चार चांद लावले. सुरेल आवाजात देशभक्ती गीते सादर करून संपूर्ण वातावरण संगीतमय केले. या सोहळ्यात भगिनी वर्षा तांबोळी, संगिता कोष्टी, राधिका पोतदार, ललिता तारू व प्रज्ञेश गोसावी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्षा योगिता गोसावी यांनी केले होते.
