अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
कष्टकरी गटई कामगार यांना स्टॉल लायसन देण्याबाबत पुणे महापालिका करत आहे दिरंगाई,
रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त एन. जे. प्रदीप चंद्रन यांना निवेदन
पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयामधून रिपब्लिकन चर्मकार महासंघ या संघटनेला कष्टकरी गठाई कामगार यांना स्टॉल लायसन देण्याबाबत लेखी स्वरूपात पत्र देण्यात आले होते, एक वर्ष उलटून गेल्याने तरीसुद्धा पुणे महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे, तरी पाठपुरावा करून लवकरात लवकर पुणे शहर जिल्ह्यामध्ये कष्टकरी गठाई कामगारांना स्टॉल लायसन्स देण्यात यावे या संदर्भाचे निवेदन पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त एन, जे, प्रदीप चंद्रन यांना देण्यात आले होते,
संघटनेच्या वतीने गेली सात वर्षापासून गठाई कामगारांसाठी पाठपुरावा करत आहे, वेळोवेळी पुणे महापालिकेसमोर आमरण उपोषण आंदोलने करण्यात आली होती आत्तापर्यंत कष्टकरी कामगारांना न्याय मिळाला नसून तरी कष्टकरी गटाही कामगारांना न्याय द्यावा अन्यथा संघटनेच्या वतीने आपल्या पुणे महानगरपालिका कार्यालयासमोर दिनांक 14/8/ 2025 रोजी एक दिवसीय उपोषण करण्यात येणार आहे, तसेच त्यावेळी मागण्या पूर्ण न झाल्यास 15 ऑगस्ट 2025 रोजी पुणे महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजू भाऊ बनसोड यांनी एका पत्रकाद्वारे दिली,
यावेळी मुख्य सचिव सुनील गायकवाड, सचिव विजय वरछाये, खजिनदार सुनील राठी, गठाई कामगार जिल्हाध्यक्ष सुनील चराटे, पुणे शहर अध्यक्ष रोहिदास थोरात, पुणे शहर कार्याध्यक्ष उमेश चराटे, बंडू पुरुषोत्तम, राधा मांजरामकर, छाया सूर्यवंशी, रवींद्र शिराळे, आदि यावेळी उपस्थित होते,
