अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पोलादपूर तालुक्यातील ओंबळी गावचे सुपुत्र
के. के. साहेब – कृष्णा मारुती कदम
संस्थापक अध्यक्ष – वैद्यकीय मदत कक्ष
यांना मातृभूमी सोशल फाउंडेशन यांच्या वतीने
राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार
मिळाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
प्रतिनिधी मुकूंद मोरे
खरोखरच के. के. साहेब म्हटलं की
ते फक्त नाव राहत नाही
तर एक चेहरा आठवतो
सेवेचा, समर्पणाचा आणि सामाजिक जबाबदारीचा
आजवर हजारो गरजूंना, रुग्णांना
वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला
मुंबईसारख्या बलाढ्य शहरात
जेव्हा एखादा सामान्य कुटुंबातील रुग्ण
सरकारी रुग्णालयात धडपडतो
तेव्हा त्या गर्दीतून एक चेहरा समोर येतो…
“कृष्णा कदम साहेब
एक छोटंसं रोप त्यांनी लावलं होतं
ते आता वटवृक्ष झालं आहे.
हा वटवृक्ष आता केवळ मुंबईपुरता मर्यादित न राहता
पुणे, रायगड, कोकण, आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांपर्यंत
वैद्यकीय मदतीचा आधार बनला आहे
त्यांनी कधी पुरस्कार मागितले नाहीत
त्यांनी कार्य केलं
आणि आज तोच पुरस्कार त्यांच्या कार्याची पावती बनून त्यांच्या हातात आला आहे
