अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दीपक जी. कांबळे यांची साताऱ्यात सदिंच्छा भेट..!!
अनुजा कारखेले-देवरे सातारा जिल्हा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगांव तालुक्यांतील सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या ठाणे शहरांपासून ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा देणारे आणि नुकतेच सेवानिवृत्त झालेले आदरणीय पोलीस अधिकारी मा. दीपक जी कांबळे साहेब यांची साताऱ्यात संभाजी पुरीगोसावी सातारकरांनी शुक्रवारी सायंकाळी सदिंच्छा भेट घेतली… यावेळी आदरणीय दीपक जी कांबळे यांच्याशी पुरी गोसावी यांनी मनमोकळा संवाद साधला. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दीपक कांबळे यांनी ठाणे शहर तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा दिली. आदरणीय साहेबांकडून नेहमीच रोखठोक महाराष्ट्र ग्रुपचे विशेष कौतुक करीत आदरणीय साहेबांनी आपल्या रोखठोक महाराष्ट्र ग्रुप मधील सर्वच पत्रकार बांधवांचे विशेष कौतुक करीत आपल्या रोखठोक महाराष्ट्र ग्रुपला शुभेच्छा दिल्या.
