एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

विद्यार्थी विद्यार्थिनी पायदळ प्रांत कार्यालय धडकले

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

 

पिंपरुड आश्रम शाळेतील विद्यार्थ्याना सोयी सुविधा मिळत नसल्याने

विद्यार्थी,विद्यार्थिनी पायदळ प्रांत कार्यालय धडकले.

यावल प्रतिनिधी सुरेश पाटील

यावल तालुक्यातील फैजपूर शहरापासून तीन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपरुड येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना आश्रम शाळेत मुलभूत सोयी सुविधा मिळत नसल्यानं तसेच आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी यांचे आश्रम शाळेवर नियंत्रण राहिले नसल्याने आश्रम शाळेतील संतप्त विद्यार्थ्यांनी बुधवार दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी पायदळ चालत सरळ प्रांताधिकारी कार्यालय गाठले व आपल्या व आश्रम शाळेतील अनेक समस्या प्रांताधिकारी बबनराव काकडे याच्या समोर मांडल्या.

आश्रम शाळेत असलेल्या सोय सुविधा विद्यार्थी व संस्था चालक याच्या मध्ये शाब्दिक चकमक उडाली असल्याचे सांगण्यात आले या मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्त्या शमिभा पाटील यांनी केले.
राजकीय प्रभावाखाली सुरू असलेल्या
पिंपरुड येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय अनुदानित आश्रम शाळेत इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत विद्यार्थी असून यात विद्यार्थी व विद्यार्थिनी सोबत शिक्षण घेत आहे या आश्रम शाळेत विद्यार्थ्याना प्राथमिक, आवश्यक मूलभूत सुविधा त्यात पोषक असे जेवण न देता निकृष्ट साहित्याचे,वस्तूंचे जेवण दिले जाते जेवणाचा कोणतेही वेळा पत्रक नाही. तसेच शिक्षणासाठी लागणारे पुस्तके व साहित्य ही दिले जात नाही निवासी शाळा असताना विद्यार्थ्याना वर्ग खोल्यात झोपवले जात आहे त्याच प्रमाणे गणवेश सुद्धा दिलेला नाही स्त्री पुरुष अधीक्षक सुद्धा या शाळेत नियुक्त नाही तर रात्री महिला रेक्टर नाही. ११ / १२ वी तुकड्या बंद करायला सांगत संस्था अध्यक्ष धमक्या देतात या सर्व बाबीला कंटाळून इयत्ता ११ व १२ वी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी पायी चालत प्रांत कार्यालय गाठले यावेळी आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना ही बोलवण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग सराफ व शिक्षक वर्ग याची ही उपस्थिती होती यावेळी विद्यार्थी यांनी आश्रम शाळेतील समस्यांचा पाढा प्रकल्प अधिकारी याच्या समोर वाचला त्यानंतर प्रांताधिकारी बबनराव काकडे याच्या दालनात प्रकल्प अधिकारी अरुण पवार,स.पो.नी रामेश्वर मोताळे,नायब तहसीलदार जगदीश गुरव,संस्था अध्यक्ष पांडुरंग सराफ,सामाजिक कार्यकर्ते शमिभा पाटील यांच्यात बैठक होवून विद्यार्थ्याचा समस्या सोडवण्यासाठी काय उपाय योजना कराव्या लागतील याबाबत सविस्तर चर्चा झाली मात्र विद्यार्थ्याचा या पवित्रामुळे शाळेतील सोय सुविधा चे पितळ उघडे पडले असून या गंभीर समस्यांकडे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्यासह आश्रम शाळेतील संबंधित सर्व यंत्रणेचे हितसंबंध असल्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जळगाव जिल्ह्यातील काही आश्रम शाळा मधील विद्यार्थ्यांमधून केला जात आहे तरी याकडे सत्ताधारी विरोधी गटाने आपले लक्ष वेधून आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

बातमीत चौकट. ( प्रतिक्रिया )

पिंपरुड ता यावल येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय अनुदानित आश्रम शाळेतील सोयी सुविधा बाबत विद्यार्थ्याचा तक्रारी प्राप्त झाल्या असून याची गांभीर्याने दखल घेतली आहे या संदर्भात शाळेला भेट देऊन चौकशी केली जाईल व विद्यार्थ्याना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्था चालक यांना सूचना देण्यात येतील.
अरुण पवार – आदिवासी प्रकल्प अधिकारी यावल.

 

पिंपरुड ता यावल आश्रम शाळेत ४५० विद्यार्थी व विद्यार्थिनी शाळेत शिक्षण घेत आहे या विद्यार्थ्याना मूलभूत सुविधा न देता तक्रार दिल्यास तुमच्या शाळेच्या दाखल्यावर लाल शेरा मारू अशा धमक्या संस्थाचालकांकडून दिल्या जातात या विद्यार्थ्याचा न्याय हक्कासाठी विद्यार्थी सोबत प्रांत कार्यालयात दाद मागण्यासाठी आलो आहे
शामिभा पाटील – जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link