अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पत्रकार संभाजी पुरीगोसावी सातारकरांचा रक्षाबंधन संपन्न… सौ. सारिका गिरी गोसावी यांनी बांधली राखी..!!
अनुजा कारखेले-देवरे ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी
रक्षाबंधन म्हणजे रक्षण करण्याचे बंधन रक्षाबंधन हा सण बहिण भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो. हा सण मराठी महिन्यांच्या श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहांने साजरा करतात. रक्षाबंधन वचन प्रेमाचे बंधन घेवुन आला हा श्रावण महिन्यांतील नारळी पौर्णिमेला सर्वत्र उसात साजरा केला जातो रक्षाबंधन हा बहिण-भावाचा लोकप्रिय सण मानला जातो. आहे. त्या अनुषंगाने आज पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांच्या मूळगावी करंजखोप या ठिकाणी त्यांची बहीण सौ. सारिका भरत गिरीगोसावी ( फलटणकर ) यांनी आपल्या लाडक्या भावासोबत मोठ्या उत्साहांत भावाला औक्षण करीत रक्षाबंधन साजरा केला. यावेळी मातोश्री. कविता पुरीगोसावी सौ. विमल पुरीगोसावी श्री.दत्तात्रय पुरीगोसावी यश गिरी गोसावी उपस्थित होते. रक्षाबंधन सणाच्या अनुषंगाने आपल्या लाडक्या बहिणीला संभाजी पुरीगोसावी यांनी गोपनीय स्वरूपात भेटवस्तू दिली. आमची लाडकी बहिण ही सणापुरतीच नाही, तर कायमच माझ्यावर बहिणीची करडी नजर आहे. नेहमीच मार्गदर्शन सल्ला नेहमीच काही गोष्टी समजुतीच्या प्रेरणादायी असे संदेश कायमच बहिणीकडून असतात. तसेच माझ्या नेहमीच संपर्कात राहून कुटुंबाची खुशालीची विचारपूस तर माझी लाडकी बहीण आम्हां सर्वच भावांसाठी नेहमीच प्रयत्नशील आहे.
