अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे जिल्हा मिक्स बॉक्सिंग राज्यस्तरीय स्पर्धा २०२५
पुणे प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
27 जुलै 2025 रोजी आपल्या तालुका संकुल मध्ये पुणे जिल्हा मिक्स बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय स्पर्धेसाठीचे पुणे जिल्हा निवड चाचणी पार पडली. या स्पर्धेचे आयोजन मुळशी तालुका मिक्स बॉक्सिंग असोसिएशन यांनी केलं होतं.
आपल्या पुणे जिल्हा मधील विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा. येणाऱ्या शालेय स्पर्धेत त्यांनी अधिकाधिक पदके मिळवावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
यामध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील 270 विद्यार्थ्यांमध्ये ही स्पर्धा पार पडली. या विद्यार्थ्यांमधून प्रथम. द्वितीय व तृतीय क्रमांकास प्रशस्तीपत्र व मेडल देण्यात आले.व यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड पुणे जिल्ह्याकडून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली.यात प्रमुख पाहुणे मिक्स बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांचे सचिव श्री सचिन शिंगोटे सर तसेच महाराष्ट्र मिक्स बॉक्सिंग अध्यक्ष श्रीमती कोमल ताई शिंदे मॅडम, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री किरण डाखवे सर व महाराष्ट्र टीम कोच श्री राकेश पाटील सर आणि विजया पोळ मॅडम हे सर्व मंडळी उपस्थित होते. आयोजक मुळशी तालुका अध्यक्ष श्री युवराज सकपाळ सर यांच्या नियोजनात हि स्पर्धा उत्तमरीत्या पार पाडले.
