अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
विणकर सेवा केंद्र नागपूर द्वारे ११ वा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा
नागपूर ७ ऑगस्ट २०२५
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागपुरातील नवीन सचिवालय भवन सिविल लाईन्स येथील विणकर सेवा केंद्रात 11 वा राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात आला .कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रिय रस्ते महामार्ग मंत्रालयातील विशेष कार्यकारी अधिकारी सुधीर दिवे उपस्थित होते तसेच महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूरचे सहसंचालक गंगाधर गजभिये , विणकर सेवा केंद्र नागपूरचे उपसंचालक संदीप ठुबरीकर , सहाय्यक संचालक महादेव पवनीकर प्रामुख्याने उपस्थित होते
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना सुधीर दिवे यांनी सांगितले की विणकर व्यवसायाला चांगले सहकार्य मिळत असून विदर्भातील धापेवाडा कळमेश्वर यासारख्या गावामध्ये 60% संख्या विणकारांची आहे. महिला विणकारांना साडी बांधणी तसेच जकार्ट संचालन यासारख्या तंत्रज्ञानाशी ओळख होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे असे देखील त्यांनी सांगितले .
कृषी नंतर सर्वात जास्त उत्पन्न देणाऱ्या व्यवसाय म्हणून हातमागाकडे बघितले जाते. 7 ऑगस्ट 1905 रोजी विदेशी मालाची होळी करून स्वदेशीचा पुरस्कार करण्यात आला होता. यानिमित्ताने राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात येतो. अशी माहिती विणकर सेवा केंद्र नागपूरचे उपसंचालक संदीप ठुबरीकर यांनी दिली. याप्रसंगी त्यांनी इंडिया हॅन्डलूम ब्रॅन्ड, हॅन्डलूम मार्क ,विणकर सेवा सहायता केंद्र , विणकर मुद्रा योजना , विणकराच्या नोंदणीचे ऑन बोर्डिंग , समर्थ प्रशिक्षण कार्यक्रम , आर्थिक सहकार्य तसेच केंद्र सरकार द्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली .
याप्रसंगी उद्योजक निधी गांधी यांनी हातमाग तसेच विणकाम व्यवसायात खूप संधी असल्याचं सांगितलं. राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या औचित्य साधून हातमाग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विणकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .कार्यक्रम स्थळी हातमाग वस्तूंचे प्रदर्शन देखील लावण्यात आले होते
