एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

गुन्हे शाखा युनिट-४, पुणे शहरची मोठी कामगिरी खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी बाबा सरोदे अटक

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

गुन्हे शाखा युनिट-४, पुणे शहरची मोठी कामगिरी  खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी बाबा सरोदे अटक

पुणे जिल्हा कार्यकारी संपादक किरण सोनवणे 

पुणे, ७ ऑगस्ट २०२५:
युनिट-४, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी खंडणी, दहशत, आणि मारहाणीच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करून एक मोठी कारवाई केली आहे. विमानतळ पोलीस स्टेशन येथे दाखल गु.र.नं. ४८१/२०२४, कलम ३०८ (४), १८९(२), १९१ (२)(३), १९०, ३५२, ३५१(३) आर्म अॅक्ट व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी बाबा सरोदे यास जेरबंद करण्यात आले आहे.

वरिष्ठांच्या आदेशानुसार, युनिट-४ चे पथक दि. ०६/०८/२०२५ रोजी विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार विनोद महाजन व नागेशसिंग कुंवर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, फरार आरोपी बाबा सरोदे हा सध्या डी. वाय. पाटील हॉस्पीटल, पिंपरी चिंचवड येथे वॉर्ड नं. २११ समोर थांबलेला आहे.

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनानुसार पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन सरोदे यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने आपले नाव बाबा रघुनाथ सरोदे (वय ३१ वर्षे, रा. रूम नं. ३०६, सी विंग, एस. आर. ए. बिल्डिंग, विमाननगर, पुणे) असल्याची माहिती दिली. त्याने पुढील तपासात गुन्हा कबूल करत सांगितले की, सुमारे अकरा महिन्यांपूर्वी त्याने आणि त्याच्या साथीदारांनी विमाननगर येथील एस. आर. ए. बिल्डिंगजवळ फिर्यादीकडून पैशांची मागणी करत मारहाण केली होती.

ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, आणि मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहा. पोलीस निरीक्षक अमर कदम, पोलीस उप-निरीक्षक वैभव मगदुम, आणि पोलीस अंमलदार एकनाथ जोशी, विनोद महाजन, प्रविण भालचीम, अजय गायकवाड, नागेशिंग कुंवर, वैभव रणपिसे यांचा सहभाग होता.
पुढील तपास विमानतळ पोलीस स्टेशन करत असून, आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link