अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, साडेसतरानळी परिसरात दहशत माजवणारे आरोपी २४ तासांच्या आत अटकेत!
पुणे जिल्हा उपसंपादक गणेश राऊत
दिनांक ०४/०८/२०२५ रोजी, सायंकाळच्या सुमारास साडेसतरानळी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान, अज्ञात सहा इसमांनी दोन दुचाकींवर येत हातातील लोखंडी हत्यारांनी दुकानांची व वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली. त्यांनी मोठमोठ्याने आरडा ओरड करत शिवीगाळ करत नागरिकांमध्ये घबराट निर्माण केली व नंतर दुचाकींवरून पळून गेले.
या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७११/२०२५ अन्वये विविध गंभीर कलमांखाली (भारतीय दंड संहिता, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट) गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-०५ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले, पोनि (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे व पोनि (गुन्हे) सौ. अश्विनी जगताप यांच्या सूचनांनुसार पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी व पोउनि सत्यवान गेंड यांच्या नेतृत्वाखाली तपासपथक स्थापन करण्यात आले.
तपासदरम्यान घटनास्थळावरील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. प्राप्त माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटली. गुप्त बातमीदाऱ्याच्या मदतीने अहिल्यानगर बस स्टँड येथून दोन आरोपी व चार विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले.
अटकेत आरोपी:
1. श्रेयस विकास आलेकर, वय २०, रा. हडपसर, पुणे
2. रोहित संदीप खाडे, वय १९, रा. गोकुळनगर, कात्रज, पुणे
अधिक तपासात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व हत्यारे जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी हे करत आहेत.
ही यशस्वी कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व) श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त (परि. ५) डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग सौ. अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कामगिरीमध्ये खालील पथकाचे योगदान मोलाचे ठरले:
हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महावीर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे.
सदर तपासपथकाच्या कौशल्यपूर्ण व जलद कारवाईमुळे परिसरात दहशतीचं सावट दूर होऊन नागरिकांमध्ये विश्वास पुनर्स्थापित झाला आहे.
