आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी राज्यांच्या दिव्यांग कल्याण विभाग सचिव म्हणून पदभार स्वीकारला,
नेहमीच बदलीच्या चर्चेत असणारे अधिकारी म्हणून ओळख..!!
अनुजा कारखेले ( मुंबई ) प्रतिनिधी
होय, धडाडीचे (आयएएस अधिकारी ) म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी नुकताच राज्यांच्या दिव्यांग विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. ते यापूर्वी असंघटित कामगार विकास आयुक्त म्हणून कार्यरत होते. गेल्या 20 वर्षाच्या कार्यकाळात आत्तापर्यंत तुकाराम मुंढे यांचीही 23 वी बदली आहे. त्यांच्या बदलीमुळे आता दिव्यांग विभागातील खाबुगिरीला चांगलाच आळा बसणार आहे असे बोलले जात आहे. कायद्याच्या चौकटीत आणि रोखठोक निर्णयासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंढेची गेल्या 20 वर्षातील ही 23 वी बदली आहे. आता त्यांची राज्यांच्या दिव्यांग कल्याणचे सचिव म्हणून बदली करताना हे पद अधिकालिक वेतन श्रेणीत अवनत करण्यात आले आहे. तुकाराम मुंढे यांच्यासह आणखीन चार आयएएस अधिकाऱ्यांच्या मंगळवारी राज्य शासनाकडून बदल्या करण्यात आल्या होत्या. राजकारण्यांची तमान बाळगता जनहिंताच्या कामांना प्रथम प्राधान्य देणारे अधिकारी आणि कामचुकार अधिकाऱ्यांचे कर्दनकाळ जेष्ठ सनदी अधिकारी तसेच कायद्यांच्या चौकटीत आणि रोखठोक निर्णय, अत्यंत कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांना महाराष्ट्रांच्या महसूल प्रशासनात ओळखले जाते.
