अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
गणेशोत्सव आनंदाने साजरा करा: पण प्रशासनाच्या नियमांचे पालन करा :-
नूतन डीवायएसपी राजश्री पाटील यांचे आवाहन..!!
संभाजी गिरीगोसावी (सातारा जिल्हा ) प्रतिनिधी
अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव हा सण येत आहे. त्यासाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. आपण सर्वांनी गणेशोत्सवा आनंदाने साजरा करावा: पण प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील यांनी उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळांना केले आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रांत मोठ्या उत्साहांने साजरा केला जातो. या उत्सवात गणेश भक्तांनी शांतता आणि आनंदाने हा उत्सव साजरा करावा सर्वंच गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी नियमांचे पालन करावे. आवाजाची मर्यादा पाळावी आणि कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा त्रांस होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. तसेच वर्गणी इच्छेनुसार गोळा करावी अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे मंडप उभारून नयेत पोलिसांनी दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा करावा : असे आव्हान डीवायएसपी राजश्री पाटील यांनी केले आहे. त्या उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळाच्या बैठकीत बोलत होत्या… यावेळी नायब तहसीलदार बाबुराव राठोड स.पो.नि. रवींद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक ठाणेकर यांच्यासह आदीं पोलीस कर्मचारी,पोलीस पाटील, तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
