अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
महत्वपूर्ण आवाहन – सत्य समजून घ्या, विश्वास ठेवा!
माजी सैनिक लालाजी डोळस जिल्हा भंडारा यांच्याकडून गाव माझा उद्योगच्या सर्व सभासदांना सादर
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मनोज उराडे
प्रिय गाव माझा उद्योग परिवार, सर्वप्रथम, आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभार मानतो – कारण तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे, तोच आमची खरी ताकद आहे. आज मी, माजी सैनिक लालाजी डोळस आपल्या सर्वांसमोर एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडू इच्छितो. सध्या समाजमाध्यमांवर आणि काही पोर्टल्सवर आमच्या संस्थेविषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे. काही व्यक्ती हेतुपुरस्सर अफवा पसरवत आहेत, ज्या केवळ *गाव माझा उद्योग या संस्थेच्या कामावरच नव्हे, तर माझ्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक प्रतिष्ठेवरही आघात करत आहेत.
ही खोटी माहिती समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
पण हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की –
गाव माझा उद्योग” ही आपली संस्था कोणालाही डावलणारी नाही.
ही संस्था पारदर्शकपणे, न्याय्य पद्धतीने आणि सर्वांना सोबत घेऊनच कार्य करणार आहे.
काम अंतिम टप्प्यात… यश अगदी जवळ!
तुमच्या अथक प्रतीक्षेला, कष्टांना आणि विश्वासाला आता फळ मिळणार आहे.
संस्थेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.
हे सर्व शक्य झाले आहे, ते तुमच्या सहकार्यामुळे, आशीर्वादामुळे आणि निष्ठेमुळे.
आता ही घडी आहे – थोडं संयम बाळगा, एकमेकांवर विश्वास ठेवा, आणि अफवांकडे दुर्लक्ष करा.
सत्य आमचं बळ आहे – अफवांपेक्षा पुढे चला!
असत्य बोलणाऱ्यांना उत्तर देण्यापेक्षा, आपण आपल्या कृतीतून आणि प्रामाणिक कामातून सत्य सिद्ध करणार आहोत.
अफवांना थारा देऊ नका
एकमेकांवर विश्वास ठेवा
संस्थेच्या प्रक्रियेत सहकार्य करा
आणि… लवकरच संस्थापक आदरणीय श्री. पवन वानखेडे साहेब स्वतः आपल्यासमोर येऊन सर्व स्पष्टीकरण देतील आणि पुढील दिशा सांगतील.
आपली शक्ती – आपला एकजूट आपण सर्वांनी खांद्याला खांदा लावून चाललो, तर कोणतीही अफवा, कोणताही विरोध आपल्याला थांबवू शकणार नाही. आज आपली गरज आहे – संयम, समजूत आणि सहकार्याची. सांगण्यात आली
