अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पोलीस ठाणे नंदनवन – MPDA कायद्या अंतर्गत सराईत व धोकादायक गुन्हेगारास स्थानबद्ध केले
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर एम पी डी ए कायद्यांतर्गत कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे* नंदनवन *पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार राहुल चंद्रभान मेश्राम वय 39 वर्ष रा. हिवरीनगर देशपाडे लेआउट पो ठाणे नंदनवन नागपूर याच्या विरुद्ध,, खुन, खंडणी ,अवैद्य हत्यार बाळगणे, शिवीगाळ करून मारपिट करणे, यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्याच्याविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करून देखील त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झालेली नव्हती. त्याचे गुन्हेगारी वृत्तीमुळे परिसरामध्ये दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे सदर आरोपी विरुद्ध मा. सहा.पोलीस आयुक्त, सक्करदरा विभाग, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ -4, मा. अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, तसेच मा.सह पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे मार्फतीने मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांना सदर आरोपीस MPDA कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावानुसार मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांनी नमूद आरोपीस MPDA कायदा कलम 3 अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबत आदेश पारित केल्याने सदर आरोपीस आज दिनांक 05/08/2025 रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
आदरपूर्वक सादर,
(विनायक कोळी )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
नंदनवन पोलीस ठाणे
