एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुणे समर्थ पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या

पुणे समर्थ पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या

समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर

मौजमजेसाठी चोरल्या तब्बल ०५ दुचाकी, आरोपीस शिताफीने पकडून ठोकल्या बेडया

प्रतिनिधी गोपाळ भालेराव

समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत दि. २७/०७/२०२५ रोजी ते दि.२८/०७/२०२५ रोजी सकाळी ०९.०० वा.चे दरम्यान फिर्यादी यांनी त्यांची यमाहा कंपनीची मोटर सायकल त्यांच्या घराच्या खाली लॉक लावुन पार्क केली असताना कोणीतरी अज्ञात इसमाने सदरची मोटर सायकल चोरी केले बाबत फिर्यादी यांनी तक्रार दिल्यावरून समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १८१/२०२५ भा.न्या.सं.क. ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

 

 

सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार करीत असताना तपास पथकाने दाखल गुन्हा घडल्याच्या ठिकाणचे तसेच आजुबाजुचे परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन तसेच पोलीस अंमलदार इम्रान शेख व शरद घोरपडे यांचे गोपनीय बातमीदार यांच्याकडुन प्राप्त माहितीच्या आधारे दाखल गुन्हयातील चोरीस गेलेली मोटरसायकल ही राजेवाडी परीसरात राहणारा इसम नामे सुजल जगताप याने चोरी केली असल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्यानंतर दि.०३/०८/२०२५ रोजी संशयीत इसम सुजल जगताप यास कात्रज परीसरात सापळा रचुन त्याचे कब्जात असलेल्या दाखल गुन्हयातील चोरी केलेल्या मोटर सायकलसह शिताफीने ताब्यात घेवुन त्याच्याकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने अधिक तपास केला असता आरोपी सुजल जीतेश जगताप वय २२ वर्षे रा. राम मंदिराच्या पाठीमागे, राजेवाडी ८४४, नाना पेठ पुणे याने त्याचा मित्र विधीसंघर्षीत बालक याच्या मदतीने चाखल गुन्हयातील मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनतर सदर आरोपीकडुन दाखल गुन्हयातील चोरी केलेली मोटर सायकल जप्त करून आरोपीस दि.०३/०८/२०२५ रोजी दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

आरोपी सुजल जीतेश जगताप याच्याकडे केले तपासामध्ये आरोपीने विधीसंघर्षीत बालकाच्या मदतीने यापूर्वी देखील पुणे शहर परीसरातुन वाहने चोरी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन आरोपीकडुन त्याने पुणे शहर परीसरातुन चोरी केलेली इतर ०४ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये बंडगार्डन पोलीस स्टेशन कढील ०१ वाहन चोरीचा गुन्हा, कोंढवा पोलीस स्टेशन काडील ०१ वाहन चोरीचा गुन्हा असे एकुण ०३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असुन पोलीस उप निरीक्षक जालिंदर फडतरे आधिक तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त परि-०१, पुणे शहर, श्री. कृषिकेश रावले, मा. सहाय्यक

पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर श्रीमती अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री चेतन मोरे, यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार संतोष पागार, रविंद्र औचरे, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link