अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नियतवयोमानानूसार उद्धवराव हारकाळ सेवापूर्ती गौरवसोहळा दिमाखात संपन्न.
मानवत / प्रतिनिधी
येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शांत, संयमी, मितभाषी मात्र विज्ञान विषयाचे सखोल ज्ञान गाढे अभ्यासक असलेले विद्यालयाचे उपमुख्याध्यापक उद्धवरावजी हारकाळ यांचा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीचा सोहळा नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या सभागृहा मध्ये संपन्न झाला . आपल्या अथक परिश्रम आणि कर्तृत्वाने, प्रामाणिक सेवाभावाने आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या अमूल्य योगदानामुळे आ. उध्दवरावजी हारकाळ यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखणीय कार्यकरत एक वेगळीच ओळख निर्माण केली. या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यालयात अत्यंत उत्साहात व दिमाखात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आ. संजयजी लाड होते. या भावनिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमास पाथरी विधान सभा मतदार संघाचे युवा आमदार राजेश भैय्या विटेकर, डॉ. अंकुशरावजी लाड, संस्थेचे संचालक मदनराव नाईक, माजी शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे, मीराताई टेंगसे, प्राचार्य राम फुन्ने, माजी मुख्याध्यापक उत्तमराव थोंबाळ, के. एस. शिंदे, शिक्षणप्रेमी सूर्यभान भिसे, मदनराव हरकळ, मुंजाभाऊ टाकळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात हारकाळ सरांच्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या विद्यार्थ्यांवरील निस्सीम प्रेमाची, शिस्तीची, अध्यापनातील नवोपक्रमशीलतेची, आणि सहकार्याबद्दलच्या आत्मीयतेची साक्ष देणारे अनेक प्रसंग उपस्थितांनी उलगडून दाखवले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भाषणातून त्यांच्या कार्याचा गौरव केला. या प्रसंगी हारकाळ सरांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मनोगतातून आपल्या लाडक्या शिक्षकां विषयीच्या भावना व्यक्त केल्या या निरोप सोहळ्यास नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण, माजी मुख्याध्यापक भानूदासराव पवार, प्रा. अनुरथ काळे, दिलीप हिबारे, रणधीर सोळंके, विष्णू भिसे, भाले पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद नांदगावकर , शकूंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालयाचे मुख्याध्यापक पुंडलिक कजेवाड, संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक अवचार, रोकडे सर, आदींची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. केशव बाभळे यांनी केले. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यालयाचे उप मुख्याध्यापक मा. विश्वनाथरावजी बुधवंत यांनी मानले.
यावेळी सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमास विद्यालयातील सर्व आजी, माजी सहकारी, मित्र, नातेवाईक, विद्यार्थी व आप्तेष्टयावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
