अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
चला घडवूया बालरंगभूमी परिषद सोबत इतिहास महाराष्ट्राचा…
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी गणेश तळेकर
उपक्रमाकरिता नियम
प्राथमिक फेरी :
महाराष्ट्रातील शाखास्तरावर प्राथमिक फेरी आयोजित करून त्यातील एकल गटातून वयोगट १ मधील प्रथम आणि द्वितीय, वयोगट २ मधील प्रथम आणि द्वितीय तसेच समूह गटातून प्रथम आणि द्वितीय असे स्पर्धक अंतिम फेरीकरीता निवड होईल.
एकल गटात सादरीकरणाकरीता अवधी जास्तीत जास्त ५ मिनिट असून समूह गटाकरीता जास्तीत जास्त १० मिनिटे असेल.
एकल गट १ मध्ये सहभागी स्पर्धक बालकांनी आपण स्वतः छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्याकाळातील इतर व्यक्तिमत्वे आणि त्यांच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज अशा स्वरुपात महाराजांच्या बालपणातील घटना, शौर्य, शिक्षण, पराक्रम, राजमाता जिजाऊंची प्रेरणा याबद्दल नाट्य, नृत्य, गायन यांच्या समन्वयाने प्रभावी सादरीकरण करणे अपेक्षित आहे. एकल गट २ आणि समूह गट मधील सहभागी स्पर्धक/ संघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव ते राज्याभिषेक या कालखंडातील जास्तीत जास्त शौर्य घटना, विविध प्रसंग, गडकिल्यांवरील विजय, पराक्रम आदी घटनांचे जास्तीत जास्त संदर्भ घेत सादरीकरण करावं. या सादरीकरणात कमीत कमी ४ आणि जास्तीत जास्त ८ बालकांचा सहभाग असावा.
समूह सादरीकरणामध्ये नृत्य, नाट्य, संगीत, शिल्पकला, चित्रकला किंवा इतर कला प्रकारांचा समन्वय करून सादरीकरण प्रभावी करता येईल.
प्राथमिक तसेच अंतिम फेरीतील सर्व सहभागी तसेच विजेत्या स्पर्धक / संघांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येईल.
प्राथमिक फेरी दि. ५ ऑगस्ट ते दि. १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत आयोजित होऊन त्यातून अंतिम फेरीकरीता पात्र संघांना पुढील सूचना देण्यात येतील.
*अंतिम फेरी*
अंतिम फेरी मुंबई येथे दिनांक २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात येईल.
अंतिम फेरीकरीता निवड झालेल्या केवळ स्पर्धक बाल कलावंतांचा प्रवास खर्च आयोजकांकडून देण्यात येईल (बस किंवा रेल्वे स्लीपरच्या दरानुसार).
समूह किंवा एकल सादरीकरणाकरीता वाद्यवृंद, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा यांची व्यवस्था संघाला स्वतः करावी लागेल. आयोजकांद्वारे केवळ ध्वनी व प्रकाशयोजनेची व्यवस्था करण्यात येईल.
सादरीकरणासाठी वेशभूषा, रंगभूषा किंवा इतर साहित्यासाठी कुठलाही खर्च आयोजकांकडून दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल.
संपर्क ज्योती निसळ मॅडम +91 98203 87838, गणेश तळेकर : 9029319191
