ओंकार पवार यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला,
नेहमीच प्रयत्नशील राहणार..!!
कलावती गवळी ( नाशिक जिल्हा ) प्रतिनिधी.
नाशिक जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी बदलीच्या पहिल्याच दिवशी पदभार स्वीकारला आहे. राज्यांत सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध चांगलेच लागले असून यामध्ये महायुती सरकारकडूंन प्रशासनात मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे. मंगळवारी रात्री उशिरा महायुती सरकारकडूंन पाच ( आयएएस ) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये धडाकेबाज सनदी अधिकारी ओंकार पवार यांची बदली करण्यात आली असून. ते आता नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. सध्या ते इगतपुरी उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. मागील आठवड्यात नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आणि याच पदावर तीन आयएएस अधिकाऱ्यांची नावे फिल्डवर होती. अखेर सरकारकडून ओंकार पवार यांची नियुक्ती करण्यात आली. पवार हे यापूर्वी इगतपुरी त्रिंबकेश्वर उपविभागाचे प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यानंतर सरकारकडूंन त्यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओंकार पवार हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस अधिकारी ) आहेत त्यांची पहिलीच नियुक्ती ही इगतपुरी मध्ये होती. ते 16 ऑ 2024 पासून इगतपुरी येथे कार्यरत होते. तेथेही त्यांनी चांगलेच निर्णय घेतल्याने त्यांचे त्या भागातील नागरिकांनी स्वागत केले होते. ओंकार पवार बदलीच्या पहिल्याच दिवशी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून त्यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या. पवार हे मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत.
