अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पुणे शहरांतून पीडितेची सुटका, आरोपीला ठोकल्या बेड्या..!!
बीडच्या पीएसआय पल्लवी जाधव यांच्या टीमची दमदार कारवाई..!
अनुजा कारखेले ( बीड जिल्हा )
प्रतिनिधी. बीड जिल्हा पोलीस दलातील कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाणाऱ्या पीएसआय (पल्लवी जाधव) यांनी पुण्यात यशस्वी कारवाई केली आहे. त्यांनी एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आणि आरोपींला अटक केली आहे. पोस्टे. शिवाजीनगर गुन्हा रजिस्टर नंबर 66/2025 कलम 137 (2)143 (2) हा दिनांक 02/07/2025 रोजी दाखल झाला होता सदर गुन्हा हा 02/07/2025 अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग झाला होता. सदर गुन्ह्याच्या मूळ फाईलचे तपास अधिकारी (पीएसआय पल्लवी जाधव ) यांनी अगदी शिताफीने अवलोकन तरी त्यानंतर पीडित मुलीच्या आईची व भावाची त्यांच्या राहत्या घरी जावुन भेट घेतली. त्यांच्याकडूंन गुन्ह्या संबंधाने अधिक माहिती घेतली असता सदर माहिंतीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण कौशल्यपूर्ण तपास करून पीडित मुलगी व आरोपी यांचे लोकेशन पुणे येथे असल्याचे तपासात समोर आले, त्यावरून दिनांक 19/07/2025 रोजी सकाळी पीएसआय पल्लवी जाधव यांची टीम माननीय पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या आदेशात पुण्याकडे रवाना झाली. पुणे शहरांत लक्ष्मीनगर,वाल्हेकरवाडी येथील एका अपार्टमेंटच्या फ्लॅट मध्ये चिंचवड पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये पीडित मुलगी आरोपींच्या ताब्यातून मिळून आली. सदर आरोपींच्या मिळून घेवुन पल्लवी जाधव यांची टीम बीड केली रवाना झाली पुढील तपासणी (पोस्टे) शिरूर कासार शिवाजीनगर येथे हजर केले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पल्लवी जाधव पोलीस हवालदार उषा चौरे हेमा वाचमारे कचौरे प्रदीप येवले अशोक शिंदे पोलिस शिपाई प्रदीप वीर योगेश निर्धार सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष बीड यांच्या पथकांने केली आहे. )
