पलुस तालुक्यात अवैध धंदे जुगार मटका,गुटखा,मावाविक्री जोमात प्रशासन मात्र कोमात..!!
▪️➖➖
यावरती प्रतिबंधक कारवाई करा नाहीतर पलुस तालूका प्रति बीड होणार – रविंद्र सनके
▪️➖➖
पलुस शहर व तालुक्यात सरास राजरोसपणे अवैध धंदे दारू, जुगार मटाका,गुटखा,मावा जोमात चालू आहे या कडे प्रशासन मात्र महाभारतातील गांधारी व धृष्टराज्याच्या भुमिकेतून दिसून येत आहे वरील आदेशास कचरा डब्यामध्ये टाकुन पलुस शहर व तालुक्यात बेफाम राजरोसपणे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत. कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवून खुलेआम लोकवस्तीमध्ये जुगार, मटका, पानपट्टी गुटखा मावाविक्री व इतर ठिकाणी ना कुणाची भिती ना पोलीस प्रशासनाची भिती आहे. काही गावांमध्ये शाळा, कॉलेज नजिकच असे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. मोठ्या स्वरूपात क्लब देखिल चालू आहेत. त्यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. तसेच तरुण पिढी व्यसनाधिन व गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहेत.यातच जनतेच्या मनात आपला पलूस तालुक्यात वाल्मिकी कराड आखा जन्माला येतोय का काय अशी परस्थिती निर्माण झाली आहे…? शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात बाहेरील राज्यातून गुटखा,सुगंधी तंबाखू विक्री करणारी मोठी टोळी येत आहे या कडे मात्र अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई होते ..? त्यामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. समाजामध्ये गंभीर समस्या निर्माण होत आहेत. याचा कर्ताधर्ता करविता कोण आहे. हे देखिल शोधून काढणे गरजेचे आहे. यावरती प्रशासनाचे किंवा पोलीस यंत्रणेचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. यासाठी जुगार अड्डे व इतर अवैध धंदे बंद होण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने कडक कारवाई होणे गरजेचे आहे. तरी वरील सर्व धंदे बंद करण्याच्या दृष्टीने कारवाई व्हावी, अशी मागणी पालक, महिला वर्ग व सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. याबाबत ४ दिवसात काही कारवाई न झालेस पोलिस स्टेशनसमोरच राष्ट्रीय चर्मकार महासंघ, व भारतीय जनता पार्टी,भिमसक्ती पक्ष यांचेकडून कडकलम्क्षीचा पोतराज या स्वरुपाचा उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल. यास प्रशासन जबाबदार राहील.
