एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून एक हात मदतीचा

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून एक हात मदतीचा

ट्रस्टचे मार्गदर्शक स्व. एड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या जयंती निमित्त उपक्रम

ट्रस्टच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती

भद्रावती दि.5:-स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या जयंती निमित्त ट्रस्टद्वारे एक हात मदतीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत अनैसर्गिक मृत्यु झालेल्या पालकांच्या कुटुंबीयांना तथा गरीब विद्यार्थिनींच्या शिक्षणाकरिता आर्थिक सहकार्य करण्यात आले. स्थानिक श्री मंगल कार्यालयात दि. ४ ऑगस्ट रोजी आयोजित अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या ८३ व्या जयंतीचे औचित्य साधून सदर उपक्रम राबविल्या गेला.

याप्रसंगी व्यासपिठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कृषी मूल्य आयोग मुंबई चे अध्यक्ष पाशा पटेल, स्वागताधक्ष विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोराचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, माया मोरेश्वर टेमुर्डे यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, रुलर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष रमेश राजुरकर, भाजप ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे, गुरुदेव सेवा मंडळाचे लक्ष्मण गमे, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, यांच्यासह विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोराचे उपाध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक जयंत टेंमुर्डे, विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोराचे सचिव अमन टेंमुर्डे, सहसचिव राजेंद्र गावंडे, कोषाध्यक्ष अभिजीत बोधले, संचालकवृन्द श्यामराव लांबट, ईजाज अशरफ, डॉ. माया राजुरकर, डॉ. विजय गावंडे, डॉ. शैलेश महाजन आणि शांता बोथले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

तालुक्यातील मुरसा येथील सुभाष कामतवार व गिरजाबाई कामतवार यांचा अपघाती मृत्यु झाला. आकाश आणि नंदिनी कामतवार या दोन भावंडांच्या डोक्यावरील मातृपितृ छत्र गमावले. या भावंडांना ट्रस्टचे उपक्रम “विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम” या योजनेअंतर्गत ट्रस्टकडून केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते आर्थिक सहकार्याचा धनादेश देण्यात आला. तर तालुक्यातील कान्सा (सि.) येथील देवीदास आसुटकर यांची म्हैस सर्प दंशाने मरण पावल्यामुळे ट्रस्टचे उपक्रम “विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम” या योजनेअंतर्गत ट्रस्टकडून त्यांना श्रीमती मायाबाई मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या हस्ते आर्थीक सहकार्याचा धनादेश देण्यात आला. सोबतच “डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना” या योजनेअंतर्गत चंद्रपुर उर्जानगर येथील बीएस्सी नर्सिंग प्रथम वर्षाला शिकत असलेली कुमारी साक्षी वाघ हीला ट्रस्टकडून शैक्षणीक मदतीचा धनादेश महाराष्ट्र कृषी मुल्य आयोग मुंबई चे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविल्या जातात. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यासिका योजना, विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम, विदेही शद्‌युत श्री संत जगमाद महानान जनतामुती व प्रबंधन कार्यक्रम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदे विषयक मार्गदर्शन उपक्रम, श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभिवान, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना, डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना, अनाथांची माई स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना, कै. म ना पावडे क्रिडा स्पर्धा आदी योजना सुरु आहेत. या सर्व योजनांचा लाभ गरजूंनी घ्यावा, असे आवाहन यावेळी ट्रस्टचे संस्थापक संचालक रवींद्र शिंदे यांनी केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link